Urmila Kanetkar On Adinath Kothare Divorce Rumors: मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) उर्मिला कानेटकरनं (Urmila Kanetkar) आजवर अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. उर्मिलानं 2003 मध्ये 'तुझ्याविना...' मालिकेतून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर तिनं अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं. उर्मिला 'दुनियादारी' (Duniyadari), 'शुभ मंगल सावधान' (Shubh Mangal Savdhan), 'मला आई व्हायचंय' (Mala Aai Vahhaychy!), 'ती सध्या काय करते' (Ti Saddhya Kay Karte) यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये (Marathi Movie) झळकलेली. त्यासबोतच 'काकण' सिनेमात तिनं साकारलेल्या भूमिकेची विशेष चर्चा झाली. उर्मिलानं मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही (Hindi Movie) काम केलंय.

Continues below advertisement

2014 मध्ये रिलीज झालेल्या 'वेलकम ओबामा'मधून तिनं तेलुगु इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. पण, उर्मिला जेवढी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. तेवढीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्मिला आणि तिचा पती दिग्दर्शक, निर्माता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्यात काहीच आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता उर्मिलानं एका मुलाखतीत बोलताना यावर आपलं मौन सोडलंय.   

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कानेटकरनं अभिनेता , दिग्दर्शक, निर्माता आदिनाथ कोठारेसोबत आपली लग्नगाठ बांधलेली. दोघांनी 2011 साली लग्न केलं. दोघांचंही लव्ह मॅरेज होतं. मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी फॅमिली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोठारेंची उर्मिला सून झाली. 2017 मध्ये उर्मिला आणि आदिनाथ यांच्या आयुष्यात त्यांची मुलगी 'जिजा'चं आगमन झालं. त्यानंतर दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत चाललेलं. पण, अचानक आदिनाथ, उर्मिला यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं. दोघांनी यावर काहीच वक्तव्य केलं नव्हतं. आता उर्मिलानं मात्र यावर मौन सोडलं आहे. 

Continues below advertisement

आपल्या अभिनयामुळे चर्चेत असणारी उर्मिला गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जातायत. तसेच, वेगवेगळ्या चर्चा रंगतायत. अशातच आता त्या सर्व चर्चांवर उर्मिलानं मौन सोडलंय. झी24 तासला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उर्मिलाच्या चाहत्यांनी तिच्या धाडसाचं आणि प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे. 

उर्मिला कानेटकर काय म्हणाली? (Urmila Kanetkar On Divorce Rumors)

उर्मिला कानेटकर म्हणाली की, "सोशल मीडियावर काय बोललं जातं याचा मी विचार करत नाही. त्या चर्चा टॉक्सिक असतात. काही गोष्टी खऱ्या असतात, काही खोट्या... पण त्याचा परिणाम माझ्यावर होऊ देत नाही. माझ्या कामात इतकं व्यस्त असते की कोण काय बोलतंय हे पाहणं मला गरजेचं वाटत नाही... प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य असतात असं नाही. म्हणूनच लोकांनीही सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला खरेपणाचा शिक्का मारू नये..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Suraj Chavan Fiance Sanjana Dance Video: सूरज चव्हाणची लगीनघाई, दणक्यात झाला घाणा भरण्याचा कार्यक्रम, होणाऱ्या बायकोचा भन्नाट डान्स होतोय VIRAL