Urfi Javed : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत असते. अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये उर्फीला ट्रोलर्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
मुलाखतीमध्ये उर्फीला प्रश्न विचारण्यात आला की, 'तुम्हाला ट्रोलर्सची भिती वाटत नाही का? तुम्ही त्यांच्या विरोधात काही तक्रार करणार आहात का? ' या प्रश्नावर उर्फीनं उत्तर दिलं, 'ट्रोलर्स माझे वडील किंवा सासू नाहियेत. ते अनोळखी लोक आहेत. त्यांना मी का घाबरू? इंस्टाग्राम हे 1920 च्या सासू सारखं झालं आहे. '
उर्फीला बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. उर्फीने भैया की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह आणि पंच बीट सीजन 2 या मालिकेमध्ये काम केले. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर 1.6 मिलियनपेक्षा जास्त फोलवर्स आहेत.
संबंधित बातम्या
Abhijeet Bichukale : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; अभिजीत बिचुकले सलमान खानवर भडकला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha