Dawood Ibrahim Madly In Love With Anita Ayoob: दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) म्हणजे, अंडरवर्ल्डमधलं (Underworld) सर्वात मोठं नाव. 1970 आणि 1980 च्या दशकात त्यानं मुंबईतील गुन्हेगारी जगतात स्वतःचं जाळं उभं केलं आणि पुढे 'डी-कंपनी' ही गुन्हेगारी जगतातील सर्वात मोठी संघटना स्थापन केली. भारतासह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय. 90च्या दशकात मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये दाऊद इब्राहिमचं मोठं वर्चस्व होतं. त्याचा प्रभाव केवळ गुन्हेगारी जगतापुरताच मर्यादित नव्हता, तर बॉलिवूडमध्येही (Bollywood News) त्याची मोठी पकड असल्याच्या चर्चा त्याकाळात रंगायच्या. अनेक बॉलिवूडचे बडे स्टार्स टाऊदसाठी पायघड्या घालायचे, असंही सांगितलं जातं. कित्येक दिग्गज अभिनेत्यांचे, अभिनेत्रींचे त्याच्यासोबतचे फोटो आजही व्हायरल होत असतात. त्या काळात अनेक बड्या अभिनेत्रींची नावं दाऊद इब्राहिम याच्याशी जोडली गेली होती. पण, त्यापैकी एक अभिनेत्री अशी होती, जिच्या सौंदर्यावर अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) दाऊद इब्राहिम खूप भाळलेला. ती अभिनेत्री (Bollywood Actress) म्हणजे, अनीता अयूब (Anita Ayoob). 

Continues below advertisement

पाकिस्तानातील कराची इथे जन्मलेल्या अनीता अयूब हिनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच लक्ष वेधून घेतलं. ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक देव आनंद (Dev Anand) यांनी त्यांना आपल्या सिनेमातून संधी दिली. तिच्या सौंदर्यानं तिनं अनेकांची मनं जिंकलेली. पण, अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याची आणि दाऊद इब्राहिमशी जोडल्या गेलेल्या कथित संबंधांचीच अधिक चर्चा रंगली, ज्यामुळे ती त्या काळात चर्चेचा विषय बनली होती.

Continues below advertisement

अभिनेत्री अनिता अयूब कोण? (Who Is Anita Ayoob?)

दाऊद सोबत जोडल्या गेलेल्या नावाचा अभिनेत्रीच्या कारकि‍र्दीवर गंभीर परिणाम झाला आणि अखेर अनिता अयूब यांना बॉलिवूडपासून फारकत घ्यावी लागली. कधीकाळची गाजलेली ही अभिनेत्री आज सर्वसामान्य आयुष्य जगतेय. अनिता अयूब यांचा जन्म पाकिस्तानातील कराचीमधला. मनोरंजन विश्वात पाऊल टाकण्यापूर्वी त्यांनी इंग्रजी साहित्यात मास्टर्स डिग्री घेतलेली. मुंबईत आल्यानंतर त्यांनी रोशन तनेजा ॲक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं.

देव आनंद यांच्याकडून मिळालेली मोठी संधी (Anita Ayoob Bollywood Career)

तिनं मॉडेलिंगमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि एका मासिकातील जाहिरातीमुळे ती देव आनंद यांच्या नजरेत भरली. देव आनंद यांनी अनिता अयूबला 1993 मधील 'प्यार का तराना' सिनेमात काम करण्याची संधी दिली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही, तरीही अनिता यांच्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर त्या 1995 मधील 'गँगस्टर' सिनेमातही झळकल्या, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावणार, असं वाटत असतानाच त्यांच्याबद्दलच्या अनेक अफवांनी जोर धरला. 

अनिता अयूब यांच्यासाठी दाऊद इब्राहिमनं केलेली हत्या (Dawood Ibrahim In Love With Anita Ayoob)

दाऊद इब्राहिमचं अनिता अयूब यांच्यावर प्रेम जडलेलं, अशी चर्चा होती. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलेलं, ज्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ उडालेली. त्या काळातला सर्वात गंभीर आरोप असा होता की, निर्माते जावेद सिद्दीकी यांनी अनिताला आपल्या सिनेमात घ्यायला नकार दिलेला, त्यावेळी दाऊदच्या माणसांनी त्यांची हत्या केलेली. या प्रकरणात अनिता यांचा थेट सहभाग असल्याचं कधीच सिद्ध झालं नाही, तरीही या अफवांनी त्यांची प्रतिमा मलीन केली. या वादामुळे त्यांची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आणि त्यानंतर त्यांना बॉलिवूड सोडावं लागलं. 

अनिता अयूब यांनी सर्व आरोप आणि अफवांवर कधीच सार्वजनिकपणे कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण, 1990 च्या दशकाच्या शेवटी शेवटी त्या बॉलिवूड सोडून न्यूयॉर्कला निघून गेल्या. तिथे त्यांनी भारतीय बिझनेसमन सौमिल पटेल यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे. काही वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघेही वेगळे झाले, त्यानंतर अनिता अयूब यांनी पाकिस्तानचा बिझनेसमन सुबक मजीद याच्यासोबत दुसरं लग्न केलं. सध्या त्या बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आयुष्य जगतायत, तसेच त्या माध्यमांपासूनही दूरच राहतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pradeep Ranganathan Life Story: फिल्मसाठी सोडली मोठ्या पगाराची नोकरी, पण वडिलांपासून लपवलं; अखेर नशीब चमकलं, आता ब्लॉकबस्टर किंग म्हणून ओळखला जातो 'हा' अभिनेता

ABP Majha च्या बातम्या LIVE