एक्स्प्लोर

उल्लू ॲपवरील 'हाऊस अरेस्ट' शो वादाच्या भोवऱ्यात; आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, एजाज खान यांच्या अडचणीत वाढ

House Arrest Controversy: उल्लू अॅपवरील (Ullu app) 'हाऊस अरेस्ट' (house arrest) या शो विरोधात आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Ullu app house arrest show : उल्लू अॅपवरील (Ullu app) 'हाऊस अरेस्ट' (house arrest) या शो वरुन नवा वाद (House Arrest Controversy) सुरू असून, या शोवर बंदी घालावी, या मागणीने जोर धरलाय. अशातच आता या शो विरोधात आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शो मधून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. परिणामी या प्रकरणात बजरंग दलाकडून अंधेरी आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच तक्रारीच्या अनुषंगाने उल्लू वरच्या कलाकार एजाज खान सोबत उल्लू अँपचा एमडी अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्यामुळे अभिनेता एजाज खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

...अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!- चित्रा वाघ

दुसरीकडे, उल्लू अ‍ॅपवरील कंटेटवर विरोधात भाजपच्या विधानपरिषदेच्या नेत्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आक्षेप नोंदवत कडाडून विरोध केला आहे. राज्यातील दोन्ही महिला नेत्यांनी उल्लू या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!”एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, अशी मागणी भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही मागणी केली आहे.  

दरम्यान, महिला नेत्या आक्रमक झाल्यानंतर उल्लू अॅपने मोठा निर्णय घेतलाय. उल्लू अ‍ॅपने 'हाऊस अरेस्ट' या रिअ‍ॅपलिटी शोचा वादग्रस्त व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आहे. सोबतच एजाज खान हा शो होस्ट करत आहे. अलीकडेच, या रिअ‍ॅपलिटी शोच्या एका भागात, स्पर्धक मुलींना त्यांचे कपडे काढण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना असे काही प्रश्न देखील विचारण्यात आले होते ज्यावर देशभरातून या शो वर सतत टीका होत होती आणि शोवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. अशातच आता या प्रकरणी आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच तक्रारीच्या अनुषंगाने उल्लू वरच्या कलाकार एजाज खान सोबत उल्लू अँपचा एमडी अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

व्हिडीओ

Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report
Beed Girl Letter Ajit Pawar : शिकायचं की ऊसोड करायची? चिमुकलीने पत्रातून मांडली व्यथा Special Report
Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget