Udit Narayan Kissing Controversy: लाईव्ह शोमध्ये (LIVE Show) प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांनी महिलेला किस केलं. तर हे सर्व चाहत्यांचं गाण्याविषयी आणि गायकांसाठीचं वेड आहे, त्यामुळे याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही, असं स्पष्टीकरण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदित नारायण यांनी दिलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायलेल्या नामांकीत गायक उदित नारायण यांचा किसिंग व्हिडीओ व्हायरल होताच एकच गोंधळ उडाला. या व्हिडीओमध्ये उदित नारायण एका महिला चाहत्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. यानंतर त्यांनी अचानक त्या चाहतीच्या ओठांवर किस केलं. या व्हायरल व्हिडीओवर उदित नारायण यांना खूप ट्रोल करण्यात आलं. आता या प्रकरणावर उर्फी जावेदनं (Urfi Javed) वक्तव्य केलं आहे. उदित नारायण (Udit Narayan Kissing Viral Video) यांच्या व्हिडीओसोबतच आता उर्फी जावेदचं वक्तव्य व्हायरल होत आहे.
उतार वयात असंच होतं...
उर्फी जावेदनं इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण यांच्याबाबत वक्तव्य केलं. ज्यावेळी उर्फीला उदित नारायण किसिंग कंट्रोवर्सीबाबत विचारण्यात आलं, त्यावेळी ती गाणं गुणगुणायला लागली. ते गाणं म्हणजे, "किस किस को प्यार करूं मैं. किस किस को दिल दूं मैं... त्यानंतर उर्फी म्हणाली की, "पापा कहते हैं... तो पापा ही बडा नाम करेंगे. 69 वर्षाचे आहेत ना ते... आता त्यांचं वयच असं आहे... उतार वयात असंच होतं..."
व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर उदित नारायण यांचं स्पष्टीकरण
प्रसिद्ध गायक उदित नारायण हे त्यांच्या उत्कृष्ट आणि सदाबहार गाण्यांसाठी ओळखले जातात. अलिकडेच झालेल्या एका सिंगिंग कॉन्सर्टमध्ये उदित नारायणच्या एका व्हायरल व्हिडिओवरून गोंधळ उडाला आहे. त्या व्हायरल व्हिडिओवर उदित नारायण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, चाहत्यांचे प्रेम व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे.
उदित नारायण पुढे म्हणाले की, "चाहत्यांना गाण्यांमुळे गायकांचे वेड असते. आपण तसं नाही आहोत, आपण सुसंस्कृत लोक आहोत. हा सर्व वेडेपणा आहे. तसेच, काही लोक गायकाला गाण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि त्याद्वारे त्यांचे प्रेम व्यक्त करतात. आता मी या गोष्टीचे काय करावे? गर्दीत बरेच लोक आहेत आणि आमचे बॉडीगार्डही तिथे असतात. पण चाहत्यांना वाटते की त्यांना त्याला भेटण्याची संधी मिळत आहे, म्हणून काही जण भेटण्यासाठी हात पुढे करतात, काही जण हातांची किस घेतात... हे सर्व चाहत्यांचं गाण्याविषयी आणि गायकांसाठीचे वेड आहे. यामुळे त्याच्याकडे इतके लक्ष देण्याची गरज नाही..."
मला लाज का वाटावी?
दरम्यान, यासोबतच उदित नारायण यांनी म्हटलं की, "मला लाज का वाटावी? तुम्हाला माझ्या आवाजात पश्चाताप, लाज दिसली का? मला तर हसू येत होतं. जे काही घडलं ते वाईट किंवा सीक्रेट नव्हतं. सर्व पब्लिक डोमेनमध्ये आहे. माझं मन स्वच्छ, नितळ आहे. जर लोक खऱ्या प्रेमाला वाईट बोलत असतील, तर मला अतीव दुःख होतं."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
