Singer Udit Narayan gets trolled: गेल्या काही दिवसांपासून उदित नारायण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. उदितची एक्स वाईफ रंजना नारायण झा हिनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिनं आरोप केला की, गायकाने तिच्या परवानगीशिवाय तिचे गर्भाशय काढून टाकले. यानंतर सिनेसृष्टीत अक्षरश: खळबळ उडाली. रंजना हिनं उदित नारायणसह इतर तीन जणांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर अद्याप उदित नारायणची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, उदित नारायणच्या पत्नीनं केलेल्या आरोपांचं प्रकरण ताजे असतानाच, गायकाच्या व्हायरल व्हिडिओने खळबळ उडवली. या व्हायरल व्हिडिओत उदित नारायण त्याचा मित्र अभिजीत भट्टाचार्यचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. तसेच मद्यपान करताना दिसत आहे.
खरंतर हा व्हिडिओ अभिजीतचा मुलगा जय याने शूट केला आहे. व्हिडिओत उदित नारायण आणि अभिजीतसोबत संगीतकार जतिन पंडितही दिसत आहेत. उदित नारायण या व्हिडिओमध्ये 'पहला नशा पहला खुमार' हे गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांत काही दिवसात व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उदितला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, सगळे जण मिळून पार्टी करत आहेत. घरात भगवान गणपती यांचा फोटो आहे. या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. देवाच्या फोटोसमोर मद्यपान आणि पार्टी करणे चुकीचं आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी उदित नारायणला ट्रोल केलं आहे. एकाने म्हटलं की, 'ते लोक वाढदिवस साजरा करत आहेत, हे चांगले आहे. परंतु, त्यांनी त्यांच्या मागे भगवान गणेशा यांचा फोटो झाकायला हवा होता', असं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी उदीत नारायणला ट्रोल केलं आहे.
मुंबईत येऊन दुसऱ्या महिलेशी विवाह
उदित नारायणची पहिली पत्नी रंजना नारायण झा हिनं गायकावर आरोप करत म्हटलं की, उदित आणि रंजना या दोघांचं लग्न 7 डिसेंबर 1984 रोजी झाले होते. 1985 साली उदित करिअरला आकार देण्यासाठी मुंबईत आला होता. त्यानंतर काही महिन्यांनी तिथे दुसरं लग्न केलं. दीपा नारायणशी उदितनं दुसरं लग्न केलं.