मुंबई : 'द ग्रेट कपिल शर्मा शो'ला टक्कर देण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता एक धाडसी, बेबाक आणि धमाल टॉक शो येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म प्राम व्हिडओने मंगळवारी आपल्या आगामी ओरिजिनल टॉक शो 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' च्या निर्मितीचा औपचारिक आरंभ करण्याची घोषणा केली. प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्ना हा शो सादर करणार आहेत. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्रींच्या उर्जेचे आणि आकर्षक शैलीचे कॉम्बिनेशन लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बनिजेय एशिया (Banijay Asia) या शीर्ष निर्मिती संकुलासोबत हात मिळवून, प्राइम व्हिडिओ हा शो निर्मित करत आहे. त्यात बॉलीवुडचे नेतृत्व करणारे, अत्याधुनिक आणि नावाजलेल्या हस्तींची गेस्ट लिस्ट असणार आहे. 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' हा शो ग्लॅमरस रेड कार्पेट कार्यक्रमांना देखील मागे टाकण्याची शक्यता आहे. कारण हा शो बोल्ड, स्पार्कलिंग आणि पूर्णपणे अनफिल्टर्ड स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

प्राम व्हिडओ इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स, निखिल माधोक म्हणाले: “‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ ची घोषणा करताना आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. ही एक अशी टॉक शो स्वरूपातली नवी ओळख आहे, जिथे दोन प्रखर आणि जीवंत आवाज हे जनर पुनर्कल्पित करतील. काजोल आणि ट्विंकल त्यांच्या खास अंदाजात एंजॉयबल, स्पष्ट आणि बेबाक संवादातून गप्पांची मैफील साधतील.

बनिजेय एशिया-मधील ग्रुप चीफ डेवलपमेंट ऑफिसर मृणालिनी जैन, व एंडेमोल शाइन इंडिया द्वारे, आपल्या उद्दिष्टाबद्दल पुढे म्हणाल्या: “‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ बेबाक बोलणी, स्पष्ट अभिप्राय आणि निर्भय संवाद या सर्वांच्या उत्तम संयोजनाचा अनुभव असेल आणि त्यात सहभागी होणारे भारतीय सिनेसृष्टीतील अगणित स्टार्स चर्चा घडवणार. काजोल आणि ट्विंकल यांच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्यांच्या मित्रत्वातून आलेल्या आयुष्यातील अनुभवांमुळे हा शो खळखळून हसणारा, प्रेरणादायक तसेच सगळ्यांना जोडणारा बनेल. बनिजेय एशियात आम्ही नेहमीच असे ओरिजिनल फॉर्मॅट तयार करण्याचा प्रयत्न करतो जे प्रेक्षकांना पूर्णपणे बांधून ठेवतील आणि प्राइम व्हिडिओचा उपयुक्त भागीदार म्हणून सहभाग हाच योग्य ठरतो.”

Two Much with Kajol and Twinkle : या शोची रुपरेखा कशी असेल?

होस्ट: काजोल आणि ट्विंकल खन्ना

फॉर्मट: बोल्ड · बेबाक · मजेदार · अनफिल्टर्ड

प्रॉडक्शन: बनिजेय एशिया

व्यासपीठ: प्राम व्हिडओ इंडिया

गेस्ट लिस्ट : बॉलिवूड व मनोरंजन जगतातील चार्मिंग आणि नामवंत व्यक्ती

ही बातमी वाचा: