मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन चर्चेत आहे. कायमच आपल्या ट्वीट किंवा वक्तव्यांमुळे वादात असणारी अभिनेत्री कंगना रनौत देखील या आंदोलनावरुन पुन्हा चर्चेत आली आहे. कारण तिने शेतकरी आंदोलनाचा ना केवळ विरोध केला तर एका वृद्ध महिलेविरोधात फेक ट्वीट करत अपशब्द वापरले. कंगनाच्या या भूमीकेवर गायक दिलजीत दोसांजने टीका केली आणि शेतकऱ्यांची माफी मागण्याचा सल्ला दिला.


एका वृद्ध महिलेविरोधात फेक ट्वीट करत अपशब्द वापरल्यानंर दिलजीतने कंगनावर टीका केली. कंगनाच्या टीकेवर कंगनाने त्याचा उल्लेख करण जोहरचा पाळतू असा उल्लेख केला. यावर दिलजीतने देखील प्रत्युत्तर देताना तू देखील बॉलिवूडची पाळीव प्राण्यासारखीच आहेस असं म्हटलं. या ट्वीटनंतर कंगना आणि दिलजीतमध्ये चांगलचं ट्वीटर वॉर रंगलं.


परंतु हे भांडण एवढ्यावरच थांबलं नाही त्यानंतर कंगनाने पुन्हा ट्वीट करत दलजीतवर निशाणा साधला. कंगना ट्वीटमध्ये म्हणाले, “ए चमच्या, माझ्यावर टीका करू नकोस… तू ज्यांच्याकडे काम मागतोस, त्यांच्यावर मी रोज टीका करते. मी तुझ्यासारखी कोणाची चमची नाही. मी फक्त शाहीन बाग आंदोलनकर्त्यांवर माझं मत मांडलं होतं. याशिवाय कोणी काही सिद्ध केले तर मी त्यांची माफी मागेल."





दिलजीत दोसांज याने कंगनाच्या याच ट्वीटवर प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांची माफी मागण्याचा कंगनाला सल्ला दिला आहे. दिलजीत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, थोडे फार चांगले कर्म करण्याची इच्छा असेल तर पंजाबच्या प्रत्येक आईची कंगनान माफी मागितली पाहिजे. एवढचं नाही तर कंगनाला एखादा मुद्दा भरकटवण्यात कशी माहीर आहे हे देखील सांगितले.