लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरी Good News! लग्नानंतर दीड वर्षांनी होणार आई, खास पोस्ट करत म्हणाली...
या फोटो सोबत तिने एक खास कॅप्शनही लिहिलाय. तिने शेअर केलेल्या या आनंदाच्या बातमीवर चाहत्यांनीही भरभरून प्रतिसाद देत तिचं अभिनंदन केलं आहे.

Hindi TV Actress: हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगवेगळ्या लोकप्रिय मालिकांमधून नाव कमावणारी अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 'कबूल है' ,'नागिन 3' यासारख्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या अभिनेत्रीने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. सुरभीच्या घरी आता एका नव्या सदस्याचे आगमन होणार आहे. अभिनेत्रीने एक फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची गुड न्यूज तिने चहात्यांना दिली. या फोटो सोबत तिने एक खास कॅप्शनही लिहिलाय. तिने शेअर केलेल्या या आनंदाच्या बातमीवर चाहत्यांनीही भरभरून प्रतिसाद देत तिचं अभिनंदन केलं आहे.
27 ऑक्टोबर 2024 रोजी सुरभीने अभिनेता सुमित सूरीसोबत लग्न केलं होतं. उत्तराखंडचा जिम कॉर्बेट मधल्या आहाना रिसॉर्टमध्ये या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. आता लग्नाच्या दीड वर्षांनंतर या दोघांच्याही आयुष्यात नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. Instagram वर दोघांनीही एक सुंदर फोटो शेअर करत सुरभी आई होणार असल्याची बातमी दिली आहे. तिने लिहिलं,' our greatest adventure begins, little love arriving this June'
View this post on Instagram
सुरभीने लिहिलं, “ॐ. आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर प्रवास आता सुरू होणार आहे. आपलं छोटंसं गोड बाळ या जूनमध्ये येणार आहे.” ही पोस्ट शेअर केल्यानंतर सुरभीच्या इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी आणि कलाकारांनी त्वरित प्रतिक्रिया देत कमेंट सेक्शनमध्ये प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आनंद व्यक्त केला.
अभिनेत्री कृष्णा मुखर्जी, श्वेता तिवारी आणि अरिजीत तनेजा यांनी “अभिनंदन” अशी प्रतिक्रिया दिली. तर अभिनेता नकुल मेहताने हार्ट इमोजीद्वारे आनंद व्यक्त केला. अभिनेत्री मौनी रॉयने “मनापासून अभिनंदन” असं लिहिलं. किश्वरने कमेंट करत, “दोघांनाही खूप खूप शुभेच्छा, म्हणूनच तू इंस्टाग्रामवरून गायब होतीस,” असं म्हटलं.
कोण आहे सुरभी ज्योती?
सुरभी ज्योती ही हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका कबूल है मध्ये जो याच्या भूमिकेत ती झळकली. या भूमिकेतील तिचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि ती घराघरात लोकप्रिय झाली. याशिवाय तिने 'नागिन ', 'गुनाह' आणि 'कोई लोट के आया है' यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले.
























