Mumbai: मुंबईत  मिरा रोड परिसरात टेलिव्हिजन अभिनेत्री शमीम अकबर अली (Shamim Akbar Ali) हिच्यावर एका ऑटोचालकाने गैरवर्तन आणि जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार अभिनेत्रीच्या पाच वर्षांच्या मुलीसमोर घडल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शमीमने या प्रकरणाची तक्रार काशीमिरा पोलिसांकडे दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे नेटीझन्स संताप व्यक्त करत आहेत.

Continues below advertisement

रिक्षावाला अचानक चिडला अन्...

घटनेबाबत बोलताना शमीम म्हणाली, “1 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. त्या आपल्या मुलीला शाळेतून घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी ऑटोचालकाला शाळेजवळ थांबवण्यास सांगितले असता तो अचानक चिडला आणि शिवीगाळ करत भांडू लागला. त्याने घाईत भाड्याची मागणी केली. शमीम म्हणाल्या, “मी माझ्या मुलीला उचलून त्याच ऑटोमध्ये बसले आणि त्याला घरापर्यंत सोडण्यास सांगितले.”

शमीम पुढे म्हणाली, “जेव्हा आम्ही आमच्या सोसायटीच्या गेटजवळ पोहोचलो, तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली. माझ्या मुलीने थोडं पुढे फाउंटन एरियापर्यंत जायचं सांगितलं, पण मी नकार दिला आणि दुसरा ऑटो घेते असं म्हटलं. इतक्यात तो ड्रायव्हर संतापला आणि माझा उजवा हात पकडून जोरात मुरगळला. हे सर्व माझ्या पाच वर्षांच्या मुलीसमोर घडलं.” 

Continues below advertisement

पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार 

या प्रसंगामुळे घाबरलेल्या शमीमने तत्काळ ऑटोतून उतरून जवळच्या लोकांकडे मदतीसाठी धाव घेतली. या घटनेनंतर अभिनेत्रीने पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून, संबंधित ऑटोचालकाचा रजिस्ट्रेशन नंबरही पोलिसांकडे आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे आणि आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. दरम्यान, शमीम सध्या चित्रपटसृष्टीपासून थोडी दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.शमीम पुढे म्हणाली, “मी अजूनही या घटनेतून सावरले नाही. माझ्या मुलीच्या समोर घडलेला प्रसंग विसरणे कठीण आहे. अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून पुढे कोणालाही महिला किंवा मुलांवर अत्याचार करण्याचं धाडस होणार नाही.”