Sanchita Ugale Ends Life: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं वयाच्या 30 व्या वर्षी आत्महत्या केली. मुंबईतील नालासोपारा (Nalasopara) येथील राहत्या घरात तिनं साडीच्या सहाय्याने आयुष्य संपवलं. राहत्या घरातच अभिनेत्रीचा (Entertainment) मृतदेह सापडला. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी 7च्या दरम्यान, घडली असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्रीनं आयुष्य का संपवलं? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अभिनेत्री सोशल मीडियात प्रचंड सक्रीय होती. ती दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटना आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत होती. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी अभिनेत्रीनं एक व्हिडीओ शेअर केला होता. तिचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
संचिता उगलेच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या तपासात कोणती माहिती उघड? (Actress Sanchita Ugale Death News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता उगले ही नालासोपारा पूर्व येथील आचोले गावात आपल्या आई - वडील आणि 15 वर्षीय बहिणीसोबत राहत होती. रविवारी सायंकाळी अभिनेत्री एकटी घरी होती. यादरम्यान, संचितानं सीलिंग फॅनला साडी लावून गळफास घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती समोर येताच, संचिताला तुलिंज हॉस्पिटल येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून अभिनेत्रीला मृत घोषित केले.
संचिताच्या कुटुंबाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत तपासाला सुरुवात केली. अभिनेत्रीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? यासाठी पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास केल्यानंतर घटनास्थळावरुन अद्याप कोणतेही सुसाईड नोट सापडलेली नाही.
अभिनेत्रीची इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट (Sanchita Ugale last Instagram Post)
अभिनेत्री सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असायची. तिनं इन्स्टाग्रामवर बरेच व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेत्री मृत्यूपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत अभिनेत्रीनं, 'मैं नाचू तू नचा'या गाण्यावर लिपसिंग केली आहे. तिच्या हातात कॅमेरा दिसत आहे. तसेच तिनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या शेवटच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून, सध्या तिच्या पोस्टवर श्रध्दांजली वाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
30व्या वर्षी घरातच आयुष्याचा दोर कापला, प्रसिद्ध TV अभिनेत्री संचिता उगले आहे तरी कोण?
