Harshad Chopda Shares Relationship Story in Lockup 2: 'लॉकअप सीझन 2' (LockUp Season 2) सध्या प्रचंड चर्चेत आहे.  या सीझनमध्ये अनेकांनी बरेच खुलासे केले आहेत.  या भागात आकांक्षा आणि राम कपूर यांनी आपल्या (Entertainment) आयुष्याशी निगडित अनेक धक्कादायक खुलासे केले.  लॉकअप 2च्या घरात हर्षद चोप्रा याने देखील एन्ट्री केली. त्याने या शोमधून आपल्या आयुष्यातील धक्कादायक (Harshad Chopda) रहस्य उघड केले. हे रहस्य उघड करताना हर्षद भावुक (Relationship) झाला होता. त्याच्या पाणावलेल्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं. त्याने आपल्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला. हर्षदने स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला असल्याचं सांगितलं.

Continues below advertisement

हर्षदने आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न (Harshad Chopda Lock Upp 2 Relationship)

हर्षद चोप्रा. या अभिनेत्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं. त्याने ' ये रिश्ता क्या कहलाता है '  या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने लॉकअप या रिऍलिटी शोमध्ये सहभाग घेतला. अलीकडेच या शो मध्ये त्याने हृदयावर दगड ठेऊन रिलेशनशिपबाबत भाष्य केलं. जेव्हा त्याला कळालं की, आपल्याला रिलेशनशिपमध्ये धोका मिळत आहे. तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला. त्याने आत्मत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपले मनगट कापले.

यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा पोलीस केस दाखल करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी त्याने ही केस रिझॉलव्ह केली. यानंतर त्याने स्वतःला 1 वचन दिले की, तो कधीच असे कृत्य पुन्हा करणार नाही.

Continues below advertisement

 

हर्षदने शो होस्टसमोर सांगितलं की, ' माझं हे पहिलं रिलेशन होतं. नक्की काय झालं.  काहीच कळालं नाही. ती नाराज होती. फोन करून तिने मला सांगितलं होतं की, मी एकासोबत आहे... मी जे काही त्यावेळेस फील करत होतो. ते पुन्हा मला फील करायचं नाही. मला प्रचंड धक्का बसला. मला काय करू काहीच सुचत नव्हतं. मी माझी मनगट कापून घेतली. निशाण अजूनही आहे' असं हर्षदने सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मराठीतल्या बहुचर्चित हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकला 'बिग बॉस'फेम अभिनेता; मालवणी ऐकून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या