Man Pishachch horror movie: तुंबाड या कल्ट हॉरर चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.  या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारे दिग्दर्शक राही अनिल बर्वे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  त्यांचा आगामी 'मन पिशाच्च' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. एक मिनिट 40 सेकंदाच्या  व्हिडिओने प्रेक्षकांचं मनोरंजन  तर केलंच तसेच मनंही जिंकली. 'मन पिशाच्च' फक्त दिग्दर्शकाच्या सिग्नेचर स्टाइलमुळे चर्चेत नसून, ही फिल्म साइकोलॉजिकल फोक हॉरर जीरो बजेट सिनेमा आहे. 

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, 'मन पिशाच्च' या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने एक खास प्रयोग केला आहे.   हा चित्रपट त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्सचा वापर करुन तयार केला आहे. तसेच IPhoneचा वापर करुन शूट केलेले काही फुटेज देखील वापरले आहेत. 'मन पिशाच्च'  या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना नक्कीच तुंबाडची आठवण येईल. विशेष म्हणजे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार नाही, थेट  Youtubeवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे. 

'मन पिशाच्च' या चित्रपटाबाबत राही अनिल बर्वे यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी पारंपारिक प्रोडक्शन उलट AI सॉफ्टवेअर आणि डिजिटल टुल्सचा वापर करुन  हा चित्रपट तयार केला आहे. रहस्यमय ट्रेलरमधून पौराणिक कथा,  दडपलेल्या भावनांची क्रुरता आणि मानवी मनाच्या काळ्या कोपऱ्यांचे खोल मानसिक संघर्ष दिसून येते.  'मन पिशाच्च' या ट्रेलरमध्ये रहस्यमय कथा आणि प्रेक्षकांना विचारात पाडणारी दृश्य दाखवण्यात आली आहे. एआयचा पुरेपूर आणि योग्य वापर करुन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

 

'मन पिशाच्च' या चित्रपटाची पटकथा जय गुलमोहर यांनी लिहिली आहे. अधिक संवादावर अवलंबून  न राहता, चित्रपट दृश्ये, शांतता आणि आवाजाचे वर्णन यावर भर देते. राही अनिल बर्वे स्पष्ट करतात की, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार महिने लागले होते. मेकर्स या चित्रपटाला झिरो बजेट प्रोजेक्ट म्हणत जरी असले तरी, हा चित्रपट तयार करण्यासाठी, प्रोडक्शनसाठी साधारण 33,000 रुपयांचा खर्च झाला आहे.  सध्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली आहे.