एक्स्प्लोर

Trisha Krishnan Aishwarya Rai 26 Year Old Look: तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी?

Trisha Krishnan Recreates Aishwarya Rai 26 Year Old Look: तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात तृषा कृष्णन यांच्या लूकची चर्चा झालेली.

Trisha Krishnan Recreates Aishwarya Rai 26 Year Old Look: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Tamil Nadu Assembly Elections) तामिळनाडूच्या राजकारणात (Tamil Nadu Politics) मोठा उलटफेर पाहायला मिळाला. अभिनय सोडून राजकारणात आलेल्या थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या टीव्हीके पक्षानं (TVK Party) ऐतिहासिक विजय नोंदवत, सत्ता स्थापन केली आणि खुद्द थलपती विजय मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले.  

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय (CM Thalapathy Vijay) यांचा शपथविधी सोहळा अनेक कारणांनी खास ठरला. त्यापैकी एक म्हणजे, सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनं हिनं शपथविधी सोहळ्याला लावलेली हजेरी. थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात तृषा कृष्णन हिनं जरीची 'आईस-ब्लू' कलरची साडी वेअर केलेली. तसेच, तिच्या पारंपरिक लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं. सिम्पल पण क्लासी लूकमुळे सर्वांच्या नजरा तृषा कृष्णन हिच्यावरच खिळलेल्या. आपल्या पारंपरिक साजात तृषा थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात मिरवत होती. अशातच आता तृषा कृष्णन हिच्या शपथविधी सोहळ्यातल्या लूकवरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. तृषाचा लूक विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची कॉपी असल्याचं सांगितलं जातंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Trish (@trishakrishnan)

तृषा कृष्णन हिचा शपथविधी सोहळ्यातला खास लूक (Trisha Krishnan Look)

तृषा कृष्णन थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात पारंपरिक साजात दिसली. ती अत्यंत सुंदर दिसत होती. अनेकांनी तृषाचं भरभरुन कौतुक केलं, पण आता तिच्या लूकची ऐश्वर्या राय बच्चन हिच्या 26 वर्षांपूर्वीच्या एक लूकशी तुलना होतेय. 

तृषा कृष्णन हिनं नेसलेली साडी 'पोथीज' (Pothys) या ब्रँडची होती. ही साडी तृषानं एका खास डिझायनर ब्लाउजसोबत मॅच केलेली. जीआरटी ज्वेलर्सचे हिरे आणि माणकांचे दागिने, गजरा माळलेला अंबाडा, काजळानं रेखलेले डोळे आणि ड्यूई मेकअप यामुळे तिचा हा लूक अधिकच खुलून दिसत होता. या समारंभादरम्यान, तिनं थलपती विजय यांच्या आईला प्रेमानं मिठीसुद्धा मारली आणि त्यानंतर चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत ती कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातल्या तृषा कृष्णन हिच्या उपस्थितीची जोरदार चर्चा रंगली. तिच्या लूकचं सर्वांनी भरभरुन कौतुकही केलं. पण, अशातच काही युजर्सनी तृषा कृष्णन हिच्या लूकची तुलना 2000 साली ऐश्वर्या राय बच्चन हिनं केलेल्या एका लूकशी करायला सुरुवात केली. त्यावेळी, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीदरम्यान ऐश्वर्या राय हिनं अगदी तसाच लूक केलेला, जसा काही दिवसांपूर्वी तृषा कृष्णन हिनं थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात केलेला. 

ऐश्वर्या राय हिनं आईस-ब्लू' कलरची सोन्याच्या धाग्यांनी नक्षीकाम केलेली साडी नेसली होती. सोन्याचे दागिने, भांग पाडून बांधलेला अंबाडा, 'विंग्ड आयलायनर' आणि गुलाबी रंगाची लिपस्टिक वापरून तिनं आपला लूक कम्प्लीट केलेला. 

ऐश्वर्या आणि तृषाचा लूक अगदीच सेम टू सेम (Trisha Krishnan Recreates Aishwarya Rai 26 Year Old Look)

सोशल मीडिया युजर्सनी या दोन्ही अभिनेत्रींचे फोटो शेअर केले. एका युजरनं हे फोटो पोस्ट करताना, त्यांना 'पोनियिन सेल्वन' या सिनेमातल्या त्यांच्या संबंधित पात्रांची नावं, नंदिनी आणि कुंदवई, दिली आहेत. काही युजर्सनी ऐश्वर्याच्या 2000 सालातील 'कंधुकोंडैन कंधुकोंडैन* या सिनेमातील एका सीनचा फोटोही शेअर केला आणि असं सुचवलं की, तृषा कृष्णन हिचा लूक त्या सीनवरून प्रेरित असल्याचं दिसून येतंय.

दोघींमधील कनेक्शन (Trisha Krishnan Aishwarya Rai Look)

तृषा कृष्णन आणि ऐश्वर्या राय या दोघी मणिरत्नम यांच्या सिनेमात एकत्र दिसलेल्या. 'पोनियिन सेल्वन-1' (2022) आणि 'पोनियिन सेल्वन-2' (2023). काही युजर्सनी चुकून असा दावा केला की, तृषानं तीच साडी नेसली होती, जी ऐश्वर्या रायनं इरुवर चित्रपटात नेसली होती. या लूकचा मूळ संदर्भ 2000 सालातील एका वेगळ्याच कार्यक्रमातील ऐश्वर्याच्या एका फोटोशी जोडलेला होता. तृषाचा हा लूक सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आणि लोकांनी त्याचं कौतुक करताना, या लूकला 'अभिजात सौंदर्याचं' एक उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sukesh Chandrashekhar : 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिससह सुकेश चंद्रशेखरवर आरोप निश्चित; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा निर्णय
200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिससह सुकेश चंद्रशेखरवर आरोप निश्चित; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा निर्णय
Ramcharan Bodyguard Video Viral: रामचरणला हात लावायला चाहता धडपडला; जान्हवी कपूरच्या अंगावर पडला; बॉडीगार्डने अक्षरशः हवेतल्या हवेत केलं असं काही ..; Video Viral 
रामचरणला हात लावायला चाहता धडपडला; जान्हवी कपूरच्या अंगावर पडला; बॉडीगार्डने अक्षरशः हवेतल्या हवेत केलं असं काही ..; Video Viral 
Amir Khan Third Marriage Date Confirm: वयाच्या साठीत अमीर खान तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार; 61 व्या वर्षी गौरी स्प्रॅटसोबत संसार थाटणार, तारीख, मुहूर्त ठरला
वयाच्या साठीत अमीर खान तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार; 61 व्या वर्षी गौरी स्प्रॅटसोबत संसार थाटणार, तारीख, मुहूर्त ठरला
'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडायला 10 वर्षे लागली; 'धुरंधर 2'चं सिंहासन कोण हिरावणार? बॉक्स ऑफिस हादरवू शकणाऱ्या 'या' 5 चित्रपटांची प्रचंड चर्चा
'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडायला 10 वर्षे लागली; 'धुरंधर 2'चं सिंहासन कोण हिरावणार? बॉक्स ऑफिस हादरवू शकणाऱ्या 'या' 5 चित्रपटांची प्रचंड चर्चा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Embed widget