Trisha Krishnan Joining Thalapathy Vijays Political Party TVK Rumours: सिनेसृष्टीतून निवृत्ती घेऊन साऊथ सुपरस्टार (South Superstar) थलपती विजय (Thalapathy Vijay) यानं राजकारणात धमाकेदार एन्ट्री घेतली. पहिल्यांदाच निवडणुक लढवणाऱ्या थलपती विजय याच्या पक्षानं प्रस्थापितांना धूळ चारली. विजयच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (Tamilaga Vettri Kazhagam) या नवख्या पक्षानं सर्वाधिक जागा मिळवून सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. थलपती विजयच्या टीव्हीकेनं (TVK) 234 पैकी 108 जागांवर विजय मिळवत मोठा विजय मिळवला, पण अजूनही टीव्हीके बहुमताच्या आकड्यापासून केवळ 10 जागा दूर आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीत थलपती विजयनं तिरुचिरापल्ली पूर्व आणि पेरांबूर या दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवलेली आणि दोन्ही मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे. पण, विजयला आता त्यातली एक जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे विजय ज्या मतदारसंघातून माघार घेईल, तिथून त्याची कथित प्रेयसी तृषा कृष्णन (Trisha Krishnan) निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

Continues below advertisement

तृषा कृष्णन तामिळनाडूत पोटनिवडणूक लढवणार? (Trisha Krishnan Contest By-Election in Tamil Nadu?)

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, जर एखाद्या उमेदवारानं दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवली असेल आणि त्या दोन्ही मतदारसंघांमध्ये विजय मिळवला असेल, तर त्याला दोन्ही जागा राखता येत नाहीत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, 14 दिवसांच्या आत दोनपैकी एक जागा उमेदवाराला रिक्त करावी लागेल. त्यामुळे थलपती विजयला तिरुचिरापल्ली पूर्व आणि पेरांबूर या दोन मतदारसंघांपैकी एक जागा रिक्त करावी लागेल. त्यानंतर त्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जाईल. 

मीडिया रिपोर्टनुसार, थलपती विजय पेरांबूर मतदारसंघ ठेवून तिरुचिरापल्ली पूर्वची जागा सोडू शकतो. त्यामुळे आता त्या जागेवर पोटनिवडणूक होईल. याच पोटनिवडणुकीत थलपती विजयची कथित प्रेयसी तृषा कृष्णन निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकते. त्यामुळे तृषा कृष्णन खरंच राजकारणात प्रवेश करुन पोटनिवडणूक लढवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

थलपती विजय आणि तृषा कृष्णन यांचे प्रेमसंबंध? (Romance Between Thalapathy Vijay Trisha Krishnan?)

थलपथी विजयनं 25 ऑगस्ट 1999 मध्ये संगीता सोरनालिंगम हिच्यासोबत लग्न केलेलं. दोघांना दोन मुलं आहेत. पण, लग्नाच्या 27 वर्षांनंतर, आता दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडला असून घटस्फोट घेण्यावर दोघांचं एकमत झालंय. अशातच, थलपतीची पत्नी संगीतानं घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकेत विवाहबाह्य संबंधांचा उल्लेख असल्याचंही बोललं जातंय.  

थलपथी विजयचं 2021 पासून त्या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते, ज्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. विजयनं आश्वासन दिलेलं की, तो त्या अभिनेत्रीसोबतचे संबंध संपवेल, पण वारंवार संधी देऊनही त्यानं तसं केलं नाही. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण झाला आणि पत्नीनं घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. 

मीडिया रिपोर्टनुसार, ज्या अभिनेत्रीसोबत थलपती विजयचे प्रेमसंबंध होते, ती अभिनेत्री म्हणजे, तृषा कृष्णन. पण, अद्याप विजय किंवा त्रिशा यांनी अद्याप त्यांच्या नात्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. टीव्हीकेच्या विजयानंतर त्रिशा विजय यांच्या घरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती. त्यातही निकालाच्या दिवशी त्रिशाचा वाढदिवस असल्याने सोशल मीडियावर मीम्स महापूर आला होता. आता त्रिशासुद्धा राजकारणात पाऊल ठेवत टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Thalapathy Vijay Emotional Tribute Producer RB Choudary: विधानसभा निवडणुकीचं दणक्यात सेलिब्रेशन करणाऱ्या थलपती विजयवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनानं खचला, पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप VIDEO