Trisha Krishnan Share New Post With Name Of Vijay: साऊथ अभिनेत्री (South Actress) तृषा कृष्णन (Trisha Krishnan) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूत (Tamil Nadu) झालेल्या सत्तापालटाचं श्रेय तिला दिलं गेलं. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या थलपती विजय (Thalapathy Vijay) यांचं 'लेडी लक' म्हणून तिला संबोधलं गेलं. त्यानंतर, थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातही ती दिमाखात मिरवली. पण, आता पुन्हा एकदा तृषा कृष्णन चर्चेत आहे. त्यासाठी कारण ठरतोय, तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा 'करुप्पू' (Karuppu Movie).
तृषा कृष्णन आणि सूर्या (Actor Suriya) यांची प्रमुख भूमिका असलेला 'करुप्पू' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. सिनेमाला मिळणाऱ्या प्रेमामुळे तृषा कृष्णन हिनं आनंद व्यक्त केला असून, तिनं सोशल मीडियावर काही खास बिहाइंड-द-सीन्स (BTS) फोटो शेअर केले आहेत. पण, यासोबत तिनं जे कॅप्शन लिहिलंय, त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
तृषा हिनं तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'करप्पू' फिल्मच्या (Karuppu Film) शूटिंगचे काही क्षण सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिनं बीटीएस फोटो टाकले आहेत. या फोटोंपेक्षा तिच्या कॅप्शननं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पोस्ट शेअर करताना तृषानं म्हटलंय की, "माय मॅजिकल मे... आणखी एक विजय, फक्त दैवी गोष्टी..." असं म्हणत शेवटी तिनं नजर लागू नये यासाठी वापरला जाणारा एव्हिल आयचा एमोजीही वापरला आहे. तसेच, या पोस्टमध्ये तिनं सूर्या आणि संपूर्ण टीमलाही टॅग केलं आहे.
'करुप्पू' हा तमिळ अॅक्शन-ड्रामा सिनेमा असून त्याचं दिग्दर्शन आर. जे. बालाजी यांनी केलं आहे. सिनेमातील दमदार अॅक्शन सीन्स, सूर्या यांचा दमदार अंदाज आणि तृषा कृष्णन हिच्या अभिनयाचं प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. त्यामुळे सिनेमाच्या यशाबद्दल कलाकारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची तृषाच्या सिनेमासाठी विशेष परवानगी
'करुप्पू'च्या प्रदर्शनापूर्वी काही आर्थिक वादांमुळे सिनेमाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले होते. सुरुवातीला हा सिनेमा 14 मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आर्थिक कारणांमुळे पहिल्या दिवसाचे सकाळचे शो रद्द करण्यात आलेले. त्यानंतर सूर्या यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, त्यासोबतच विजय यांनी 'करुप्पू'च्या विशेष मॉर्निंग शोसाठी परवानगी दिली आणि सिनेमा रिलीज होण्याचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे 'करुप्पू' अखेर 15 मे रोजी यशस्वीरित्या थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर सिनेमाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
