Toxic Trailer Animal Comparison: साऊथ सुपरस्टार यश सध्या त्याच्या आगामी ‘टॉक्सिक’ (Toxic) या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. यशच्या (Yash) आगामी ‘टॉक्सिक’ने आपल्या दमदार आणि धमाकेदार व्हिज्युअल्स असलेल्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्रेलरमधील अनेक सीन्सवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, चित्रपटातील एका खास सीनची सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे. हा सीन पाहून अनेकांना रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील (Ranbir Kapoor Animal) लूकची नेटकरयांना आठवण झाली आहे. त्यामुळे अनेक युजर्स यशच्या या लूकची रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील लूकशी तुलना करत आहेत.
‘टॉक्सिक’मधील तो सीन नेमका कोणता?
शनिवारी यशच्या अॅक्शन-थ्रिलर ‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’चा (Toxic) ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये यशसह चित्रपटातील इतर कलाकारांचीही झलक पाहायला मिळाली. अशातच ‘टॉक्सिक’मधील एका सीनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.ट्रेलरमध्ये यशच्या न्यूड सीनवरून सोशल मीडिया युजर्स यशच्या लूकची रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील लूकशी तुलना करत आहेत.‘टॉक्सिक’चा ट्रेलर पाहिल्यानंतर इंटरनेटवर चाहत्यांनी यशच्या व्यक्तिरेखेची तुलना ‘ॲनिमल’मधील रणबीर कपूरच्या व्यक्तिरेखेशी करण्यास सुरुवात केली. काही युजर्सनी सोशल मीडियावर यश आणि रणबीरच्या दोन्ही चित्रपटांमधील शर्टशिवाय असलेल्या सीन्सचे फोटो एकत्र शेअर केले आहेत.
यशने रणबीर कपूरची नक्कल केली?
यशचा शर्टलेस लूक पाहून काही चाहते त्याने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील लूकची नक्कल केली आहे का? असा सवाल करत आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं, ‘यशने रणबीरची नक्कल करण्यात आणि त्याच्याकडून प्रेरणा घेण्यात PhD केली आहे.’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘हा फोटो पाहून मला ‘ॲनिमल’मधील रणबीर कपूरच्या फोटोची आठवण झाली.’ एका युजरने थेट प्रश्न विचारला, ‘हा ‘ॲनिमल’ची कॉपी आहे का?’ यशच्या या लूकचं कौतुक करणारे चाहतेही आहेत. एका चाहत्याने ‘टॉक्सिक’च्या स्टारचं कौतुक करत लिहिलं, ‘यश रणबीरला दाखवून देईल की खरा ‘ॲनिमल’ कसा दिसतो.’
‘टॉक्सिक’बद्दल...
यश आणि गीतू मोहनदास यांनी लिहिलेल्या आणि गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटात यश मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.2023 मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, तर 2024 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. हा चित्रपट कन्नड आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी शूट करण्यात आला आहे. ‘टॉक्सिक’ 26 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
