Toxic Box Office Record 2026 : कन्नड सुपरस्टार यश (Yash) याच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत नवा इतिहास रचला आहे. पहिल्या दिवशी 100 कोटींहून अधिकची ऐतिहासिक ओपनिंग घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी नकारात्मक पुनरावलोकनांमुळे (Negative Reviews) कमाईत काहीशी घसरण झाली. तरीही, या चित्रपटाने हिंदी पट्ट्यात 2026 मधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Continues below advertisement

Toxic 2 Days Box Office Collection : 2 दिवसांत 185 कोटी पार!

सॅकनिल्कच्या (Sacnilk) अहवालानुसार, चित्रपटाचे दोन दिवसांचे कलेक्शन खालीलप्रमाणे आहे:

पहिला दिवस (ऑल इंडिया नेट) : 101.10 कोटी रुपये.

Continues below advertisement

दुसरा दिवस (ऑल इंडिया नेट) : 37.65 कोटी रुपये.

एकूण भारत कलेक्शन (2 दिवस) : 138.75 कोटी रुपये.

परदेशातील कमाई (Overseas) : 19.75 कोटी रुपये.

वर्ल्डवाईड एकूण कलेक्शन : 185.60 कोटी रुपये.

हिंदी भाषेत 'टॉक्सिक'ची सर्वाधिक कमाई

यशच्या या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई हिंदी व्हर्जनमध्ये केली आहे. चित्रपटाने हिंदीत पहिल्या दिवशी 55.40 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 24 कोटी असे मिळून दोन दिवसांत 79.25 कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे.

इतर भाषांमधील कलेक्शन:

कन्नड : 31.80 कोटी रुपये

तेलगू : 19 कोटी रुपये

तमिळ : 7 कोटी रुपये

मळयालम : 1.70 कोटी रुपये

Toxic 9th Highest Grossing Hindi Movie 2026 : 2026 मधील 9 वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

कोईमोईच्या (Koimoi) अहवालानुसार, दुसऱ्या दिवसाच्या कमाईसह 'टॉक्सिक' 2026 मधील हिंदीतील 9 वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून त्याने 'मैं वापस आऊंगा' (65.15 कोटी) या चित्रपटाला मागे टाकले आहे.

2026 मधील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणारे हिंदी चित्रपट:

धुरंधर 2 - 1186.32 कोटी

बॉर्डर २ - 362.76 कोटी

भूत बंगला - 199.23 कोटी

धमाल 4 - 177.92 कोटी

आवारापन 2 - 149.48 कोटी

वेलकम टू द जंगल - 137.93 कोटी

कॉकटेल 2 - 104.53 कोटी

ओ रोमियो - 83.35 कोटी

टॉक्सिक - 79.4 कोटी

मैं वापस आऊंगा - 65.15 कोटी

'टॉक्सिक' चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद (Mixed Reviews) मिळाला आहे. रक्षाबंधनच्या सुट्टीचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला. या चित्रपटात यशसोबत कियारा अडवाणी, तारा सुतारिया, नयनतारा, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

‘टॉक्सिक’च्या बजेटबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र विविध रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट सुमारे 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या बजेटचा खर्च वसूल करण्यासाठी चित्रपटाला पुढील दिवसांतही बॉक्स ऑफिसवर सातत्याने दमदार कमाई करावी लागणार आहे.

ही बातमी वाचा: