Toxic Fame Superstar Yash: ‘KGF’मधील ‘रॉकी भाई’ म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता यश (South Superstar Yash) सध्या त्याच्या आगामी ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ (Toxic) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे रामायणसारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये रावणाची भूमिका साकारताना तो दिसणार आहे. आतापर्यंत दमदार ॲक्शन थ्रिलर आणि रोमँटिक भूमिकांमध्ये दिसलेल्या यशची टॉक्सिक चित्रपटामुळे मोठी चर्चा रंगली. सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. मात्र, एवढे कोट्यवधी फॉलोअर्स असतानाही यश स्वतः मात्र इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो. कोण आहे ही व्यक्ती? जाणून घेऊया..
14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, पण फॉलो फक्त एकाच व्यक्तीला!
यशला इंस्टाग्रामवर 14 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. मात्र, यशच्या फॉलोइंग लिस्टमध्ये फक्त एकच नाव आहे. ही व्यक्ती कोणतीही अभिनेत्री, को-स्टार किंवा इंडस्ट्रीमधील मोठी व्यक्ती नसून त्याची पत्नी राधिका पंडित (Radhika Pandit) आहे. याशिवाय, ‘टॉक्सिक’मध्ये कियारा आडवाणीसोबतच्या इंटीमेट सीन्सवर पत्नीची प्रतिक्रिया काय होती, याबाबतही यशने खुलासा केला आहे. त्यामुळे यशची ही सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
कियारा आडवाणीसोबतच्या इंटीमेट सीनवर राधिकाची प्रतिक्रिया काय?
यश नुकताच रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याला ‘टॉक्सिक’मधील कियारा आडवाणीसोबतच्या इंटीमेट सीन्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर यशने पत्नी राधिकाच्या प्रतिक्रियेबद्दलही सांगितलं. तो म्हणाला 'अशा प्रकारचे सीन्स पाहताना राधिकाला अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, यामुळे त्यांच्या नात्यातील विश्वासावर कोणताही परिणाम होत नाही. राधिका स्वतः अभिनेत्री असल्याने अभिनय आणि पडद्यावरील दृश्यांकडे कसं पाहायचं, याची तिला चांगली जाणीव आहे.'
यशने सांगितलं की, “तिला हे पाहून आनंद होणार नाही, पण याचा अर्थ ती माझ्यावर नाराज आहे असा नाही.” दोघांमध्ये परस्पर विश्वास असून, पडद्यावर साकारलेली भूमिका आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये फरक असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
यश आणि राधिकाची पहिली भेट 2007 मध्ये ‘नंदा गोकुला’ या टीव्ही शोच्या माध्यमातून झाल्याचं सांगितलं जातं. आधी मैत्री आणि त्यानंतर प्रेम. 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. यश आणि राधिकाला दोन मुलं आहेत.
‘टॉक्सिक’मधील काही सीन्स यशसाठीही सोपे नव्हते
यशने कबूल केलं की ‘टॉक्सिक’मधील काही सीन्स शूट करणं त्याच्यासाठीही सोपं नव्हतं. मात्र, कथेची गरज असल्यामुळे काही प्रसंगी त्याला स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागलं. एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराला इंटीमेट सीनमध्ये पाहताना अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे. पण अभिनय ही एक कला आहे आणि कथा प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यासाठी कलाकारांना अनेकदा वैयक्तिक सहजतेच्या मर्यादा ओलांडाव्या लागतात,असंही त्याने सांगितलं.
‘टॉक्सिक’मध्ये यशचा डबल रोल
गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटात यश डबल रोलमध्ये दिसणार आहे. कियारा आडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट 26 ऑगस्ट 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
