Toxic Box Office Collection Day 9: 500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
Toxic Box Office Collection Day 9: 'टॉक्सिक'च्या बॉक्स ऑफिस कामगिरीबद्दल सांगायचं तर, सुरुवातीलाच 101.10 कोटी रुपयांच्या धमाकेदार कलेक्शन केल्यानंतर मात्र, सिनेमाच्या कमाईत घट झाली.

Toxic Box Office Collection Day 9: 'रॉकिंग स्टार' यश (Yash) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांची मुख्य भूमिका असलेला 'टॉक्सिक' (Toxic) रिलीजच्या नवव्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर (Toxic Box Office Collection) दणकून आपटला आहे. दमदार सुरुवात आणि बड्या कलाकारांची उपस्थिती असूनही, हा सिनेमा प्रेक्षकांना थिएटर्सकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरतोय. थोडक्यात सांगायचं झालं तर, निगेटिव रिव्यूमुळे लोकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवली आहे. दुसऱ्याच आठवड्यात सिनेमाच्या कमाईला मोठा फटका बसला. रिलीजच्या नवव्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी, 'टॉक्सिक'नं किती कमाई केली? सविस्तर पाहुयात...
'टॉक्सिक'नं (Toxic) नवव्या दिवशी किती कमाई केली? (Toxic Box Office Collection)
'टॉक्सिक'नं बॉक्स ऑफिसवर आपल्या नावाप्रमाणेच कामगिरी केली असून, हा सिनेमा नावाप्रमाणेच स्वतःच्याच व्यवसायासाठी 'टॉक्सिक' ठरला आहे. मोठ्या अपेक्षांसह रिलीज झालेला हा सिनेमा अवघ्या नऊ दिवसांतच थंडावला आहे. याची कमाई दररोज घटत चालली आहे आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यताही कमीच आहे. कारण शुक्रवारपासून 'मिर्झापूर: द मूव्ही' (Mirzapur: The Movie) हिंदी आणि तेलुगू थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या नव्या सिनेमामुळे 'टॉक्सिक'साठी कमाई करणं अत्यंत कठीण होणार आहे.
सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीबद्दल सांगायचं तर, सुरुवातीलाच 101.10 कोटी रुपयांच्या धमाकेदार कलेक्शन केल्यानंतर मात्र, सिनेमाच्या कमाईत घट झाली. दुसऱ्या दिवशी सिनेमानं 37.65 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर, तिसऱ्या दिवशी 27.20 कोटी, चौथ्या दिवशी 25.15 कोटी, पाचव्या दिवशी 23 कोटी, सहाव्या दिवशी 7.65 कोटी, सातव्या दिवशी 7.85 कोटी आणि आठव्या दिवशी 5.45 कोटी रुपयांची कमाई झाली.
- दरम्यान, 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'टॉक्सिक'नं रिलीजच्या नवव्या दिवशी 4.25 कोटी रुपयांची कमाई केली.
- यामुळे, भारतातील नऊ दिवसांमधील सिनेमाची एकूण नेट कलेक्शन 239.30 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
View this post on Instagram
'टॉक्सिक' आपल्या बजेटच्या निम्मी रक्कमही वसूल करू शकला नाही (Toxic BO Collection)
'टॉक्सिक' थिएटर्समध्ये रिलीज होऊन नऊ दिवस झाले आहेत. या काळात सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. जरी या सिनेमानं 230 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असला, तरी 'टॉक्सिक'चं एकूण बजेट 500 कोटी रुपये होतं. धक्कादायक बाब म्हणजे, नऊ दिवस उलटूनही हा सिनेमा आपल्या निर्मिती खर्चाच्या निम्मी रक्कमही वसूल करू शकलेला नाही. अशा परिस्थितीत, सिनेमाची कामगिरी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. 'टॉक्सिक' आता फ्लॉप ठरण्याच्या मार्गावर असल्याचं दिसतंय, कारण 500 कोटी तर सोडाच, पण 300 कोटींचा टप्पा गाठणंही अशक्य वाटत आहे.
दरम्यान, गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक'मध्ये यश डबलरोलमध्ये दिसलाय. तर, या सिनेमात नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 26 ऑगस्ट रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















