Toxic Box Office Collection day 8: प्रदर्शनापूर्वी यशच्या 'टॉक्सिक'ची (Toxic) प्रचंड चर्चा झाली. फर्स्ट लूक, टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. दरम्यान, या सिनेमाची जशी चर्चा झाली, तशाप्रकारे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकलेला (Box Office Collection) नाही. हा सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास अयशस्वी ठरला असं चित्र आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने दमदार कमाई केली. विकेंडपर्यंत या सिनेमाने डबल डिजिटमध्ये कमाई केली. विकडेजमध्ये एन्ट्री करताच या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. या सिनेमाच्या कमाईची गती मंदावली आहे. गीतू मोहनदास (Geetu Mohandas) दिग्दर्शित या गँगस्टर अॅक्शन थ्रिलर सिनेमाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी, किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
'टॉक्सिक' या सिनेमाने 8 व्या दिवशी म्हणजेच बुधवारी किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात (Toxic Box Office Collection day 8 Wednesday)
500 कोटी या बिग बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने 100 कोटींचा गल्ला जमवत ओपनिंग केली तर खरी, पण नंतर या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. खरंतर, निगेटिव्ह वर्ड ऑफ माऊथमुळे या सिनेमाच्या कमाईचा संपूर्ण खेळ बिघडवला. परंतु, यश याच्या स्टार पॉवरमुळे हा सिनेमा 200 कोटींपर्यंतचा टप्पा ओलांडू शकला. दरम्यान, बजेटची अर्धी रक्कम वसूल करणं अजून बाकी आहे.
सिनेमाच्या कमाईच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, 'टॉक्सिक' या सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 101.10 कोटींचे कलेक्शन केले आहे. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 37.65 कोटींपर्यंतची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 27.20 कोटी कमावले. तर, चौथ्या दिवशी या सिनेमाने 25.15 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. दरम्यान, पाचव्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. पाचव्या दिवशी या सिनेमाने 23 कोटींचे कलेक्शन केले. तसेच सहाव्या दिवशी 7.65 कोटी, 7 व्या दिवशी 7.85 कोटींचे कलेक्शन केले आहे.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'टॉक्सिक' या सिनेमाने प्रदर्शनाच्या 8 व्या दिवशी म्हणजेच बुधवारी 3.78 कोटींचे कलेक्शन केले आहे. या सिनेमाच्या नेट कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, एकूण 8 दिवसांत भारतात 'टॉक्सिक' या सिनेमाने 233.38 कोटींचे कलेक्शन केले आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा सिनेमा, आपले बजेट वसूल करु शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
