Toxic Box Office Collection Day 2: यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ चित्रपटाने (Toxic Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर दणक्यात एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केल्यानंतर आता चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. दुसऱ्या दिवशी मात्र कमाईत काहीशी घट झाली असली तरी ‘टॉक्सिक’ची एकूण कमाई 120 कोटींच्या पुढे गेली आहे.यश (Yash) याच्या ‘टॉक्सिक’ (Toxic) चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये रिलीजपूर्वीपासूनच मोठी क्रेझ होती. ॲडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी ओपनिंग घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Continues below advertisement

दुसऱ्या दिवशी ‘टॉक्सिक’ने किती कमावले?

कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘टॉक्सिक’ने भारतात पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये 101.10 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. तर जगभरात चित्रपटाने 140.75 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Continues below advertisement

आता दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेडनुसार, ‘टॉक्सिक’ने दुसऱ्या दिवशी आतापर्यंत 19.73 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारतातील चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 120.83 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मात्र रात्रीच्या शोचे आकडे आल्यानंतर या कमाईत आणखी वाढ होऊ शकते.

हिंदी बेल्टमध्ये ‘टॉक्सिक’ची सर्वाधिक कमाई

‘टॉक्सिक’ला हिंदी प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने हिंदीमध्ये 12.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कन्नडमध्ये चित्रपटाने 4.84 कोटी रुपये, तेलुगूमध्ये 1.20 कोटी रुपये, तमिळमध्ये 67 लाख रुपये आणि मल्याळममध्ये 27 लाख रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, पुढील काही दिवस चित्रपटासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. सुट्टी आणि वीकेंडचा फायदा ‘टॉक्सिक’ला होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवार आणि रविवारी कमाईत मोठी वाढ झाल्यास यशचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी मोठे रेकॉर्ड करू शकतो.

‘टॉक्सिक’चं बजेट किती?

‘टॉक्सिक’च्या बजेटबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र विविध रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट सुमारे 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या बजेटचा खर्च वसूल करण्यासाठी चित्रपटाला पुढील दिवसांतही बॉक्स ऑफिसवर सातत्याने दमदार कमाई करावी लागणार आहे.

पहिल्याच दिवशी 100 कोटींची ओपनिंग आणि दुसऱ्याच दिवशी 120 कोटींचा टप्पा... यशच्या ‘टॉक्सिक’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार एंट्री केली आहे. आता वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईचा आकडा किती वाढतो आणि ‘टॉक्सिक’ कोणते नवे रेकॉर्ड करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.