Tollywood : बॉक्स ऑफिस कलेक्शनचा विचार केला तर 2025 वर्ष काहीसं विशेष ठरलं नाही. बहुतांश चित्रपट अपयशी ठरले. केवळ मोजक्याच चित्रपटांनी ब्लॉकबस्टर ठरून यश मिळवलं. आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'छावा' होता. पण भारताच्या परिप्रेक्ष्यात पाहिलं तर ‘छावा’चा विक्रम एका लहान बजेटच्या चित्रपटाने पार करून टाकला आहे. या चित्रपटाचा बजेट केवळ 7 कोटी रुपये होता, पण त्याने 1200 टक्के नफा कमावला. अशा परिस्थितीत ‘छावा’ त्याच्या समोर फिकाच पडल्याच चित्र आहे.

हा चित्रपट म्हणजे तमिळ भाषेतील ‘टूरिस्ट फॅमिली’... बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त धुमाकूळ घातला. या चित्रपटाची कथा अगदी साधी आणि हलकीफुलकी आहे, पण पूर्ण पैसा वसूल आहे. ‘टूरिस्ट फॅमिली’चा बजेट केवळ 7 कोटी रुपये होता. अभिशन जीविंथ यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 90 कोटी रुपयांची कमाई केली आणि नफ्याच्या बाबतीत 2025 मधील नंबर 1 चित्रपट ठरला.

‘टूरिस्ट फॅमिली’ हा एक "स्लाइस ऑफ लाइफ" कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. यात मिथुन जय शंकर, कमलेश जगन, एम. शशिकुमार यांच्यासह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 29 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 23 कोटी रुपये कमावले. नंतर ‘वर्ड ऑफ माउथ’ (लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे) चित्रपटाने उत्तम व्यवसाय केला. भारतात याने 62 कोटी रुपये आणि जगभरात एकूण 90 कोटी रुपये कमावले.

तथापि, सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'छावा' ठरला, ज्याने 808 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याचं बजेट 90 कोटी रुपये होतं आणि त्याने 800 टक्के नफा कमावला. पण ‘टूरिस्ट फॅमिली’ने 1200 टक्के नफा कमावल्यामुळे तो वर्षातील सर्वात कमाई करणारा चित्रपट ठरला.

दुसरीकडे, 2025 मध्ये असेही काही चित्रपट होते, जे आपला बजेटसुद्धा पार करू शकले नाहीत. उदाहरणार्थ, ‘हाउसफुल 5’ – या चित्रपटाचा बजेट जास्त असल्यामुळे तो फारसा यशस्वी ठरला नाही. याने 300 कोटींची कमाई केली खरी, पण नफा फारसा नव्हता. अशाच प्रकारे सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचंही तसंच झालं. आमिर खानचा 'सितारे जमीन' हा चित्रपट 65 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता आणि त्याने 260 कोटी रुपयांची जागतिक कमाई करून 300 टक्के नफा कमावला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कारेगावच्या सरपंच मॅडमनी घेतली आणखी एक चकाकणारी कार, गाडीची किंमत किती?

शोलेमधील गब्बरचा अड्डा नेमका कुठंय? शूटिंग कुठं झालंय? निर्मात्यांनी लोकशनजवळ पोहोचण्यासाठी बनवलेला रस्ता