MP Mahua Moitra Write Letter To Actor Pankaj Tripathi: 'मला पंकज त्रिपाठी आवडतात, त्यांच्यासोबत डेटवर जायचंय'; मोदी सरकारला हैराण करणारी फायरब्रँड खासदार कालीन भैय्यावर भाळली
MP Mahua Moitra Write Letter To Actor Pankaj Tripathi: मोदी सरकारला हैराण करणारी फायरब्रँड खासदार, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी आपल्या 'दिल की बात' एका पत्रातूनही व्यक्त केली आहे.

MP Mahua Moitra Write Letter To Actor Pankaj Tripathi: बॉलिवूड (Bollywood News) असो किंवा ओटीटी (OTT), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) म्हणजे, इंडस्ट्रीतल्या मोजक्या गुणी अभिनेत्यांपैकी एक नाव. रिअॅलिस्टिक भूमिकांसाठी पंकज त्रिपाठी ओळखले जातात. बॉलिवूड सिनेमांपेक्षा ओटीटीवरच्या वेब सीरिजमुळे (OTT Web Series) पंकज त्रिपाठी अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. 'मिर्झापूर'मध्ये त्यांनी साकारलेलं कालीन भैय्या या पात्रानं, तर त्यांना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. पंकज त्रिपाठींचा शांत, संयमी स्वभाव आणि मूळात मातीशी नाळ जोडून राहणारं व्यक्तिमत्व सर्वांनाच आवडतं. त्यांचं फॅनफॉलोइंगही खूप आहे. अशातच आता त्यांच्या चाहत्यावर्गात चक्क महिला खासदाराचा समावेश होतो. या महिला खासदाराला पंकज त्रिपाठी खूप आवडतात, फक्त एवढंच नाहीतर तिला पंकज त्रिपाठींसोबत डेटवरही जायचंय.
मोदी सरकारला हैराण करणारी फायरब्रँड खासदार, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी आपल्या 'दिल की बात' एका पत्रातून व्यक्त केली आहे. महुआ मोईत्रा यांचं पत्र व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महिला खासदारानं आपल्या पत्रातून खुलासा केला आहे की, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी हे त्यांचे क्रश आहेत. तसेच, त्यांच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छाही महिला खासदारानं व्यक्त केली आहे.
इंडिया टुडेशी बोलताना महुआ मोईत्रा म्हणाल्या की, "मी मुन्नाभाई सिनेमाची सीरिज बघितली, मी ती अनेक वेळा पाहू शकते. विक्की डोनर सिनेमाही मला आवडला. मला पंकज त्रिपाठी आवडतात. मिर्झापूरचा प्रत्येक सीन मी निरखून बघितला आहे. ते सगळ्यात कूल अभिनेते आहेत, असं मला वाटतं. मिर्झापूर आणि गँग्स ऑफ वासेपूरमध्ये त्यांच्या भूमिका मला आवडल्या. मला त्यांच्या निगेटिव्ह आणि दमदार भूमिका आवडतात. मी पंकज त्रिपाठींना एक पत्रही लिहिलं होतं. त्याचं उत्तर मिळालं नाही. पण, माझ्या भावना मी त्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत..."
"मी पत्रात लिहिलं होतं की, मी तुमची खूप मोठी चाहती आहे आणि तुमच्यासोबत एकदा कॉफी डेटवर जायचंय... पण, पंकज त्रिपाठी अलिबागमध्ये राहतात. त्यामुळेच कदाचित त्यांना कॉफीसाठी वेळ नसावा...", असंही महुआ मोईत्रा म्हणाल्या आहेत.
महुआ मोईत्रा यांनी लिहिलेलं पत्र
महुआ मोईत्रा यांना ज्यावेळी समजलं की, एक न्यूज अँकर पंकज त्रिपाठींची मुलाखत घेणार आहे, त्यावेळी त्यांनी पंकज त्रिपाठींसाठी एक पत्र लिहून त्यांना पाठवलं आणि न्यूज अँकरला त्यांना द्यायला सांगितलं. एवढंच नाहीतर, महुआ मोईत्रा यांनी पंकड त्रिपाठींपर्यंत पोहोचण्यासाठी रवि किशन यांची मदत घेतलेली. रवी किशन यांनी फोनवरुन पंकज त्रिपाठींशी महुआ यांचा संपर्क करून दिला होता. पण, महुआ लाजल्या आणि त्यामुळे त्या पंकज त्रिपाठींशी फोनवर नीट बोलू शकल्या नाहीत. पंकज त्रिपाठींना भेटण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. पण, त्यांची पंकज त्रिपाठींशी भेट झाली नाही, असंही महुआ मोईत्रा यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























