Tiger Shroff Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हल्ला प्रकरणात नवनवीन अपडेट्स समोर येत आहे.  पोलिसांकडून तसेच फॉरेन्सिक टीमकडूनही (Forensic Team Report) कसून चौकशी केली जात आहे.  अशातच फॉरेन्सिक तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना सापडले आहेत. टायगर श्रॉफच्या BMW कारवर गोळीबारासाठी देशी पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हल्ला करण्यापूर्वी  अज्ञात हल्लेखोर कुठे होते? काय करत होते? याची देखील माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी (Tiger Shroff Shoot) परिसराची 45 मिनिटे रेकी केली असल्याची माहिती आहे.  

Continues below advertisement

हल्ल्यापूर्वी रेकी; संशयित आरोपी पुष्पा पार्कजवळ 45 मिनिटे थांबले (Tiger Shroff Shooting Case 45 Minute Recce Before Attack)

टायगर श्रॉफच्या चारचाकीवर जुहू परिसरात हल्ला झाला. काल सायंकाळच्या सुमारास ही भयंकर घटना घडली.  या परिसरात आरोपींनी 45 मिनिटांपूर्वी रेकी केली असल्याची माहिती मिळाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करण्यापूर्वी आरोपी पुष्पा पार्कजवळ होते. हल्ला करण्यापूर्वी संशयित आरोपी साधारण 45 मिनिटे पुष्पा पार्कजवळ थांबले होते, अशी माहिती आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाले. दोन आरोपी त्वरित तिसऱ्याने आणलेल्या दुचाकीवर बसले, तसेच पसार झाले.

 

Continues below advertisement

हल्ला केल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापर्यंत मोटारसायकलवरून गेले. पोलिसांच्या बीट चौकीजवळ CCTVच्या नजरेतून सुटण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी मोटारसायकल सोडल्याचा संशय आहे. दरम्यान,  या प्रकरणी पोलिसांकडून मोठी माहिती समोर आली आहे.  आरोपी हे सुरतच्या दिशेनं पसार झाले असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुजरात पोलीसही आता सतर्क झाले आहेत.  मुंबई पोलिसांनी सांगितले की, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपी सुरतच्या दिशेनं पळाले असावेत.  यावर खबरदारी म्हणून, सूरत पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Tiger Shroff Forensic Report: टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! देशी पिस्तुलाचा वापर अन् शूटरचे दोन प्रयत्न, दुचाकीवरुन आरोपी कसे पळाले? फॉरेन्सिक रिपोर्ट समोर

Tiger Shroff Attack Incident Salman Khan: टायगर श्रॉफवर हल्ला होताच भाईजानची सुरक्षा वाढवली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर, कारण काय..