Tiger Shroff Case: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) फायरिंग घटनेमुळे सिनेसृष्टीत (Entertainment) खळबळ उडाली. या घटनेच्या संबंधित पोलिसांकडून नवनवीन माहिती उघड होत आहे. या घटनेच्या संबंधित कोटा पोलिसांनी पुणे - जयपूर एक्स्प्रेसमधून तीन आरोपींना अटक केली आहे. दोन हरियाणा तर, एक आरोपी बिहार येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या आरोपीचं नाव हृतिक असं आहे. पोलिसांच्या मते, आरोपी हृतिक हा बाइक टॅक्सी सर्व्हिस (Bike Taxi)देणारी कंपनी 'रॅपिडो'च्या (Rapido) संबंधित होता.   'रॅपिडो' या अॅपवर तो 'कॅप्टन'च्या नावाने रजिस्टर्ड होता. दरम्यान,  'रॅपिडो'ने पोस्ट शेअर करुन या प्रकरणी आपलं एक स्टेटमेंट दिलं आहे. सध्या 'रॅपिडो'ची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

टायगर श्रॉफ प्रकरणात 'रॅपिडो'ची पोस्ट व्हायरल (Tiger Shroff Shooting Case Rapido Issues Statement)

'रॅपिडो' या प्रकरणाच्या संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'मिस्टर टायगर श्रॉफ आणि त्याच्या टीमसोबत जे काही घडलं, त्यासाठी आम्ही चिंतेत आहोत. टायगर श्रॉफ आता सुरक्षित आहे, याची माहिती मिळताच आम्हाला दिलासा मिळाला. ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आमची इच्छा आहे'. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ''रॅपिडो'प्लॅटफॉर्मवर 'कॅप्टन' म्हणून रजिस्टर्ड असलेल्या एका व्यक्तीचा उल्लेख करणाऱ्या मीडिया रिपोर्ट्सबाबत आम्हाला माहिती आहे.  तो 14 ऑक्टोबरपासून आमच्या प्लॅटफॉर्मवर 'कॅप्टन' म्हणून सक्रीय नव्हता'.

'भारतातील गिग इकॉनॉमीमध्ये एकाच वेळी अनेक प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे ही एक सामान्य बाब आहे. घटनेच्या दिवशी त्या व्यक्तीने रॅपिडोच्या सेवांचा वापर कस्टमर म्हणून केला होता', अशी माहिती 'रॅपिडो'ने पोस्टद्वारे शेअर केली आहे. 'आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. तसेच तपासात सहकार्य करत आहोत. अधिकाऱ्यांनी माहितलेली सर्व माहिती आम्ही दिली आहेत. आम्ही अधिकाऱ्यांच्या तपासात आमचे पूर्ण सहकार्य देत राहू', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या 'रॅपिडो'ने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर आणि एक व्यक्ती जखमी झाला आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Darlings Actress Death: आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का