Devendra Fadnavis On Tiger Shroff Car Firing Marathi News: मुंबईत जुहू पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटरवर अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff Car Firing) गाडीवर काल (18 ऑक्टोबर) रात्री गोळीबार झाला. बाईकवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर दहा गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुखरूप असला तरी त्याचा कारचालक फिरदोस आणि एक रिक्षाचालक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी टायगरने स्वतः गाडी चालवली. टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. (Tiger Shroff Marathi News)

Continues below advertisement

टायगर श्रॉफवरील कारवाईवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया (Devendra Fadnavis On Tiger Shroff) दिली आहे. अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याची घटना अतिशय निंदनीय आहे. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. प्रमुख धागेदोरे पोलिसांना सापडले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली. हल्लेखोरांना पोलीस शोधतीलच, पण यापाठी कोण आहेत त्यांनाही मुंबई पोलीस शोधून काढतील. अशा प्रकारच्या घटनेत कोणालाही सोडलं जाणार नाही, असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिला, तसेच सगळे हे डरपोक लोक आहेत, लपून बसलेले असतात आणि हल्ला करतात. टायगरसोबत त्यांची सुरक्षा नव्हती, ती मागे होती. त्यामुळे हे घडलं असावं  एकच अडथळा पोलिसांना येतो, तो म्हणजे महाराष्ट्रातून हे ऑपरेट केलं जात नाही.  कोणत्याही गँगला किंवा व्यक्तीला सोडलं जाणार नाही.प्रत्येक धमकी आम्ही गांभीर्याने घेतो आणि त्यावर कारवाई करतो.  शेवटी घटना गंभीर आहे. घटनेच्या अनुषंगाने जे करता येईल ते केलं जाईल. अशा घटनेचे जे आका असतात, त्यांनाही केंद्र सरकारच्या मदतीने शोधून काढलं जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

नेटवर्क उध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्र पोलीस करेल- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Tiger Shroff)

टायगर श्रॉफ यांचेशी माझे बोलणे झाले. मी टायगर श्रॉफ यांना अश्वस्त केले आहे की ते कुठलीही चिंता करू नये. ज्यांनी हे केलंय त्यांना आम्ही शोधून काढणार..., असं देवेंद्र फडणवीसांनी साांगितलं.  मुंबई पोलीस हे प्रोफेशनल पोलीस आहेत आणि मुंबई पोलीस या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश करतील. मागच्या वेळी हे ज्यावेळी या लोकांनी प्रयत्न केला त्यावेळी मुंबई पोलीसानी आरोपी शोधून काढले आणि त्यांचे जे या ठिकाणी आका होते तेही शोधून काढले. त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या घटना या खपवून घेतल्या जाणार नाही आणि मुंबई पोलीस निश्चितपणे आरोपींना शोधून काढतील. पोलिसांना उघडपणे चॅलेंज कोणी देऊ शकत नाही, हे डरपोक लोक आहेत हे कुठेतरी लपून बसतात आणि तिथून अशा प्रकारच्या वलगणा करतात आणि यांच्यात हिंमत नाही.  हे भाडोत्री लोकांच्या आधारावर ऑपरेट करणारे लोक आहेत. त्यामुळे निश्चितपणे एकच यामध्ये चॅलेंज पोलिसांना येतो की हे महाराष्ट्रातून ऑपरेट करत नाही. महाराष्ट्राच्या बाहेरून आणि देशाच्या बाहेरून ऑपरेट करतात.  केंद्र सरकारच्या एजन्सींना संपर्क साधून त्यांचं नेटवर्क उध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्र पोलीस करेल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.  

Continues below advertisement

नेमकं काय घडलं? (Tiger Shroff Car Firing Marathi News)

  • रविवार (18 ऑक्टोबर) संध्याकाळ सातची वेळ...अभिनेता टायगर श्रॉफ नेहमीप्रमाणे जुहूच्या पुष्पा पार्क येथील फुटबॉल मैदानावर आला होता टायगर श्रॉफ आल्यामुळे नेहमीप्रमाणे चहाते देखील होते.
  • 7 वाजताच्या आसपास टायगर श्रॉफ आपल्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून आपल्या चाहत्यांचा निरोप घेऊन मैदानावरून बाहेर पडलाच होता की चाहत्यांच्या गर्दीत मिसळलेल्या दोघांनी अचानक आपापल्या बंदुका बाहेर काढल्या आणि टायगरच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. 
  • दहा राऊंड या दोघांनी फायर केल्याची माहिती आहे. 
  • गोळीबार करताना एकाची बंदूक अडकली तर दुसरा मात्र गोळीबार करतच राहिला.
  • गोळीबारानंतर दोघेही बाईकवर बसून फरार झाले. 
  • या गोळीबारात टायगर श्रॉफला गोळी लागली नसली तरी गाडीच्या फुटलेल्या काचांमुळे तो जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्या छातीवर तसेच हाताला जखम झाल्याची माहिती आहे. 
  • टायगरच्या गाडीचा चालक फिरदौस हा गोळीबारात जखमी झाला असून उमेश चरण हा त्याचा फॅन देखील जखमी झाला आहे.
  • चाहत्याच्या थेट छातीत गोळी लागली असून त्याला सध्या Kem रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • तर फिरदौसवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
  • गोळीबाराच्या अल्पावधीतच बिश्नोई टोळीच्या अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी एक कथित ऑडिओ क्लिप आणि फेसबुक पोस्ट काढत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. 
  • दरम्यान गोळीबार केल्यानंतर तिघेही अज्ञात हल्लेखोर आपल्या दुचाकी वरून अंधेरीच्या दिशेने फरार झाल्याची माहिती आहे. 
  • तसेच हल्ल्यापूर्वी त्यांनी रेकी देखील केली असून घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरात त्यांच्या हालचाली चित्रित झाल्याची माहिती आहे.
  • जुहू पोलीस ठाण्यात टायगर श्रॉफच्या चालकाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 
  • पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी तब्बल 15 पथक तयार केली असून मुंबई गुन्हे शाखेने देखील समांतर तपास सुरू केला आहे.

टायगरवर हल्ला, देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातम्या:

Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?

Tiger Shroff Car Firing Marathi News: पिवळ्या रंगाची गाडी, अंधेरी रेल्वेस्थानकावर सोडून पळाले; टायगरवरील हल्ल्यासाठी वापरलेल्या बाईकबाबत धक्कादायक माहिती