Tiger Shroff Attack Case, Rahul Kanal: बॉलिवूड (Bollywood News) स्टार्स सध्या बिश्नोई गँगच्या (Lawrence Bishnoi Gang) रडारवर आल्यामुळे खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि बॉलिवूडशी जवळचे संबंध असणारे बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर सलमान खान (Salman Khan) एका जुन्या प्रकरणामुळे बिश्नोई गँगच्या रडारवर आला. सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबारही करण्यात आला. तेव्हापासून बॉलिवूडचा भाईजान सुरक्षारक्षकांच्या गराड्यात फिरताना दिसतोय. अशातच, सलमान खाननंतर इतरही बॉलिवूड सेलिब्रिटी बिश्नोई गँगच्या रडारवर आलेत. रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार, शाहरुख खानला धमकी आणि आता टायगर श्रॉफवर (Tiger Shroff Attack) झालेला गोळीबार, सततच्या या धक्कादायक घटनांमुळे बॉलिवूड पुरतं हादरुन गेलंय. अशातच आता बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच शिवसेना नेताही रडारवर असल्याचं बोललं जातंय. शिवसेना नेते राहुल कनालनं (Shiv Sena Leader Rahul Kanal) आपलं घर आणि ऑफिसची रेकी झाल्याचा दावा करत मुंबई पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
शिवसेना नेते राहुल कनाल यांनी जीवाला धोका असल्याचं सांगत मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांकडे पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. राहुल कनाल यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात आपल्या घराची आणि कार्यालयाची तीन वेळा रेकी करण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यानं, राहुल कनाल यांचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Bollywood Actor) यांच्याशी जवळचे संबंध आहेत. शिवसेना नेते राहुल कनाल यांनी जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त करत मुंबई पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी करणारं पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना नेते राहुल कनाल यांचे बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याआधी तिनदा सुरक्षेची मागणी राहुल कनाल यांनी मुंबई पोलिसांकडे केलेली. टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी सुरक्षेची मागणी केलेली.
राहुल कनाल यांचं वांद्र्यात रेस्टॉरंट आहे. त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव 'भाईजान्स' आहे, जे त्यांनी बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानच्या नावावरुन ठेवलंय. राहुल कनाल फक्त सलमान खानचे फॅन नाही, तर त्यांचा समावेश सलमान खानच्या अगदी जवळच्या लोकांमध्ये होतो. बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार झालेला. त्यावेळी सलमान खानला भेटून त्याची चौकशी करणाऱ्यांमध्ये सलमान खानच्या नावाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
