मुंबई : प्रिन्सेस डायना.. ब्रिटिश राजघराण्याची सून. राणीचा मोठा मुलगा चार्ल्सची पहिली बायको. आणि विल्यम्स आणि हॅरीची आई.. डायना. खरंतर तिची इतकीच ओळख जगाला नाहीय. कारण लेडी डायनाने आपल्या कामातून अनेकांची मनं जिंकली. सामाजिक भान जपत अनेकांना आसरा दिला तर ग्लॅमरही मिळवलं. प्रिन्सेस डायना ही स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली गेली. जी असेपर्यंत ब्रिटनसह अनेक देशांतले चाहते तिला पाहण्यासाठी आतुर असायचे. पण 1997 च्या 31 ऑगस्टला पॅरीसच्या टनेलमध्ये एका कार अपघातात डायना मृत्यूमुखी पडली. बघता बघता एक विवेकी आणि तितकाच ग्लॅमरस आयुष्य संपलं.


डायना राजघराण्याची सून म्हणून जरी सर्वांना परिचित असली तरी तिचं काम तेवढंच नव्हतं. डायनाने आपल्या कामातून अनेकांची मनं जिंकली होती. आता तिचं हे काम लोकांसमोर यावं म्हणून एक लघुपट बनवण्यात येतो आहे. या लघुपटाचं नाव आहे डायना. 2022 मध्ये हा लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. लाईट बॉक्स या निर्मात्या संस्थेनं या लघुपटाची निर्मिती केली आहे. कंपनी मार्फत आलेल्या माहीतीनुसार डायनाचं काम लोकांसमोर यावं.. ती तिच्या खऱ्या आयुष्यात कशी होती ते लोकांपर्यंत पोचावी म्हणून या लघुपटाची निर्मिती करण्यात येत आहे. 2022 मध्ये डायनाला जाऊन 25 वर्षं होताायत. त्याचं औचित्य साधून या लघुपटाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे.


डायनाने 1981 मध्ये ब्रिटिश राजघराण्यातल्या चार्ल्ससोबत विवाह केला. राजघराण्याची सून म्हणून डायना अल्पावधीच चर्चेत आली. चार्ल्स आणि डायनााला विल्यम्स आणि हॅरी ही दोन मुलं झाली. पण या दोघांचं वैवाहिक आयुष्य तितकं सुखकर नव्हतं. दोघे 1992 मध्ये वेगळे झाले. त्यानंतर त्यांची व्यक्तिगत आयुष्य सातत्याने मीडियाचं खाद्य बनत गेलं. त्यानंतर 1996 मध्ये दोघांत घटस्फोट झाला. पुढे दुर्दैवाने 1997 मध्ये पॅरीसमध्ये एका भीषण कार अपघातात डायनाचं निधन झालं. पापाराझीना चुकवताना ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पॅरीस टनेलमध्ये गाडीचा अपघात झाला. या अपघातात डायना, गाडीचा ड्रायव्हर आणि तिच्यासोबत असणारा तिचा मित्र दोदी फायद हे तिघेही जागीच ठार झाले. तर तिच्या सुरक्षारक्षक जबर जखमी झाला.


डायनाच्या निधनानंतरही ती नेहमीच एक दंतकथा बनून राहिली. डायनाने उभ्या आयुष्यात कशी कोणती कामं केली.. तिचे काही दुर्मिळ फोटो..दुर्मिळ व्हिडिओज मिळवून हा लघुपट तयार करण्यात आला आहे. डायना हा लघुपट कधी प्रदर्शित होणार त्याची तारीख अद्याप निश्चित नाही. पण 2022 मध्ये ऑगस्ट महिन्यातच ही फिल्म रिलीज करावी असा विचार निर्माते करत आहेत.