The Great Indian Kapil Show Salman Khan : ‘द ग्रेट इंडियन कपल शो’च्या तिसऱ्या सिझनची धमाकेदार सुरुवात झाली असून, पहिल्याच भागात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान झळकलेला पाहायला मिळालाय.. शो चा होस्ट आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांनी सलमान खानला त्याच्या लग्नाविषयी, पझेसिव्ह फॅन्सबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातील मजेशीर गोष्टींबाबत प्रश्न विचारले. यावेळी सलमानने अनेक खळबळजनक किस्से सांगितले. त्याने आमिर खानच्या तिसऱ्या गर्लफ्रेंडवर आणि आपल्या भाऊ सोहेल खानच्या घटस्फोटावर देखील मिश्कील टोमणे मारले. सलमानच्या या बोलण्यावर अर्चना पूरन सिंह आणि नवजोत सिंग सिद्धू यांच्यासह प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.

सलमान खानकडून घर आणि मित्रांचा किस्सा

सलमानने सांगितले की, त्याच्या घराचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत. कोणीही त्यांच्या घरी येऊ शकतो, राहू शकतो आणि पार्टी करू शकतो. त्याने आपला जुना मित्र आणि छायाचित्रकार अविनाश गोवारिकरचा किस्सा सांगितला. अविनाश त्याचे अपार्टमेंट भाड्याने देत होता, म्हणून काही काळासाठी तो सलमानच्या घरी दोन-अडीच महिन्यांसाठी राहायला आला. पण त्या दोन महिन्यांचे दोन वर्षे झाले, आणि तरीही तो निघालाच नाही.

सोहेलच्या लग्नावरून उडवली खिल्ली

एकदा सलमानने अविनाशला विचारले की, “तू ज्या अपार्टमेंटसाठी भाडेकरू शोधत होतास, त्याचे काय झाले? तू निघणार कधी?” यावर अविनाश म्हणाला की, “मी सलमानच्या घरी शिफ्ट झाल्यानंतर 15 दिवसांतच अपार्टमेंट विकत घेतले, पण ते भाड्याने दिलं.” हे ऐकून सलमानही चक्रावून गेला.

त्यानंतर सलमानने आपल्या भाऊ सोहेलच्या लग्नाबाबत किस्सा सांगितला. तो म्हणाला, “जेव्हा सोहेलचं लग्न झालं, तेव्हा त्याने अविनाशला खोली रिकामी करण्यास सांगितलं. यावर अविनाश संतापला आणि म्हणाला, ‘तू मला न सांगता लग्न कसं करू शकतोस? मी आता घर रिकामं करून कुठे जाऊ?’”

सोहेलच्या घटस्फोटावर सलमानचा मिश्कील टोमणा

या किस्स्यादरम्यान सलमानने सोहेलच्या घटस्फोटावर मिश्कीलपणे टोला लगावला. तो म्हणाला, “सोहेलने पळून जाऊन लग्न केलं... आणि आता तीही पळून गेली!” हे ऐकून स्टुडिओमध्ये उपस्थित सर्वांना हसू आवरेना.. 

सोहेल आणि सीमा यांची प्रेमकहाणी आणि विभक्त होण्याची कहाणी

सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी आर्य समाज पद्धतीने लग्न केले होते आणि नंतर 1998 मध्ये विवाह केला. त्यांच्या संसारात दोन मुले - निर्वाण (2000) आणि योहान (2011) आहेत. पण तब्बल 24 वर्षांच्या संसारानंतर, 2022 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जंगलात मिनी स्कर्टवर धावली अन् मनीषा कोयरालाच्या संपूर्ण पायाला जळू चिटकले, बॉम्बेमधील गाण्याच्या शूटींगवेळी काय घडलं होतं?