Tharla Tar Mag: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग ' मालिकेत सध्या प्रचंड ट्विस्ट येत आहेत. सलग दोन वर्ष टीआरपीमध्ये  टॉपवर येणाऱ्या या मालिकेत खलनायिका साकारणारी अभिनेत्री प्रियंका तेंडोलकरच्या ' प्रिया' चा नाटकीपणा बाहेर येणार आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात मालिकेच्या ट्रॅकमध्ये मोठा बदल पाहायला मिळालाय. सायली आणि अर्जुनकडे प्रियाच्या खोटेपणाचे सगळे पुरावे आहेत त्यामुळे मालिकेत आता प्रियाला शिक्षा होणार आहे. त्यामुळे आता मालिकेत प्रियाचं पात्र दिसणार की नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.  ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियंका तेंडोलकर मालिकेतून Exit घेणार असल्याचंही बोललं जातंय.  मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी प्रियांका तेंडोलकरने अलीकडेच या सगळ्यावर खुलासा केलाय.

Continues below advertisement

'ठरलं तर मग ' मालिकेत प्रिया दिसणार नाही ?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका गेल्या काही दिवसांपासून वेगळाच वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे सायली आणि अर्जुन ने गोळा केले आहेत. प्रियाने लोकांना कसं फसवलं हे आता लवकरच सुभेदारांना कळणार आहे. त्यामुळे अर्थातच प्रियाला शिक्षा होणार हे नक्की. पण प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर सायली आणि अर्जुनच्या आयुष्यातला मोठा अडसर दूर होणार आहे. मालिकेतून प्रिया गेल्यावर खलनायिका कोण ? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. मालिकेतून अभिनेत्री प्रियंका तेंडोलकर सोडून जाणार की काय ? अशी विचारणा होऊ लागल्यानंतर अभिनेत्रीने या सगळ्या प्रश्नांवर चाहत्यांना उत्तर दिलय. उत्तराची सध्या एकच चर्चा आहे.

प्रियांकाने अलीकडेच महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलंय. ती म्हणाली ' प्रियाचं कॅरेक्टर किंवा ट्रॅक संपत नाहीये. कारण ती आजही अश्विन सुभेदारची बायको आहे. त्यामुळे हे पात्र अजून संपत नाही. तिला शिक्षा होणार का ? तर हो. तिला शिक्षा होणार. पण शिक्षा झाल्यानंतर पुढे काय होतं , हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. पण माझं कॅरेक्टर संपत नाही इतकं मात्र नक्की. अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही मालिकेत घेऊन येणार आहोत. " त्यामुळे प्रियाला शिक्षा होणार असली तरी तिचं पात्र इथे संपत नाही. मालिकेतील मुख्य खलनायिका म्हणून प्रिया कायम राहणार यावर अभिनेत्रीनेच शिक्कामोर्तब केला आहे.