Tharla tar Mag Purna Aaji Return: ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील पात्रं, त्यांचा संवाद आणि भावना प्रेक्षकांच्या हृदयात घर केलंय.(Tharla tar Mag) काही दिवसांपूर्वी मालिकेत ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांच्या जाण्याने केवळ मालिकेच्या टीमलाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ वाटली.मात्र, आता मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, पूर्णा आजी पुन्हा मालिकेत दिसणार आहेत! आणि ही भूमिका साकारणार आहेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. (Rohini Hattangadi) त्यांच्या आगमनाने संपूर्ण टीममध्ये नवचैतन्य आलं आहे. (Marathi Serial)
Rohini Hattangadi: रोहिणी हट्टंगडी काय म्हणाल्या?
पूर्णा आजी म्हणजेची रोहिणी ताई म्हणाल्या, ‘ठरलं तर मग मालिका माझी आवडती मालिका आहे आणि मी न चुकता पहाते. याच मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे. मनात संमिश्र भावना आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहे. पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्यासोबत माझी जुनी मैत्री होती. कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन. कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते. त्या कलाकाराने केलेलं काम पुढे न्यायचं थोडं जबाबदारीचं काम आहे. माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे स्वीकारावं ही इच्छा आहे.’
सेटवर उत्साह आणि स्वागताचा जल्लोष
रोहिणी हट्टंगडींच्या एन्ट्रीमुळे सेटवर आनंदाचं वातावरण पसरलं आहे. संपूर्ण टीमने त्यांचं मनापासून स्वागत केलं. अभिनेत्री जुई गडकरी उर्फ ‘सायली’ म्हणाली,
“रोहिणी ताईंना सेटवर पाहून खूप भारावून गेलो. त्यांच्या अनुभवातून शिकायला खूप मिळणार आहे. त्यांच्या रुपाने आमच्या सेटवर एक विद्यापीठ आलंय असं वाटतं.”
मालिकेत नव्या अध्यायाची सुरुवात
‘ठरलं तर मग’च्या गोष्टीत आता नवीन टप्पा सुरू होणार आहे. रोहिणी हट्टंगडींच्या रुपात प्रेक्षकांना पुन्हा ‘पूर्णा आजी’ भेटणार आहेत, आणि मालिकेतील भावनिक नात्यांना नवी दिशा मिळणार आहे. रोहिणी ताई म्हणजेच पूर्णा आजीसोबत आता मालिकेची गोष्ट पुढे नेताना आनंद होतोय. तेव्हा पाहायला विसरु नका ठरलं तर मग रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.