Thalpati Vijay Trisha Krishnan Wedding Rumors: सुपरस्टार अभिनेता थलपती विजय (Superstar Actor Thalapathy Vijay) याच्या आयुष्यात सध्या वादळ आलं आहे. अभिनेत्याचा संसार सध्या मोडण्याच्या उंबरठ्यावर असून पत्नीनं त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप लावले आहेत. अभिनेत्याचे त्याच्याच को-स्टारसोबत अफेअर सुरू असल्याचे गंभीर आरोप करत त्याच्या पत्नीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तर, दुसरीकडे पत्नीनं ज्या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप लावले आहेत, तिच्यासोबत सुपरस्टार अनेकदा दिसून आला आहे. अशातच आता सुपरस्टार पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर को-स्टारसोबत आपली लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) आणि तृषा कृष्णन (Trisha Krishnan) हे दोघे त्यांच्या रिलेशनशिपमुळे गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सध्या हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत, असं बोललं जातंय. आता, तृषाच्या आईच्या एका कृतीमुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे. विशेषतः, तृषाची आई उमा कृष्णन यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. तसेच, विजय थलपती आणि तृषा कृष्णन दोघांच्या लग्नाच्या अफवांनाही उधाण आलं आहे.
खरं तर, विजय आणि तृषा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सातत्यानं सुरू आहेत. विजय आणि त्याची पत्नी संगीता यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्यावर, सुपरस्टारच्या या चर्चांना अधिकच वाढल्या. त्यानंतर, विजय आणि तृषा एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसले. ज्यामुळे त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री सोशल मीडियावर चर्चेचा मुख्य विषय बनली.
पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर थलपती विजय तृषा कृष्णनसोबत लग्न करणार?
दरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांनी तयार केलेला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विजय आणि तृषा नजिकच्या काळात विवाहबंधनात अडकू शकतात. मात्र, या चर्चांवर या दोन्ही कलाकारांनी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, आगामी निवडणुका पार पडल्यानंतर विजय आणि तृषा कृष्णन कदाचित त्यांच्या नात्याला अधिकृत स्वरूप देण्याचा निर्णय घेऊ शकतात.
अभिनेत्रीच्या आईचं लाईक नेमकं कशासाठी?
मात्र, ज्या गोष्टीनं लोकांचे लक्ष सर्वाधिक वेधून घेतलंय, ती गोष्ट म्हणजे, तृषाची आई उमा कृष्णन यांनी या व्हिडीओला 'लाईक' (Like) केलं आहे. या 'लाईक'चे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल होताच, चर्चांना आणखी उधाण आलं. अनेक युजर्सचं असं म्हणणं आहे की, तृषाच्या आईनं केलेलं लाईक म्हणजे, दोघांच्या नात्याबाबतची एक हिंट असू शकते. काही युजर्सनी असंही सुचवलंय की, ही प्रतिक्रिया कदाचित या गोष्टीचा संकेत असू शकते की, हे दोन्ही कलाकार त्यांच्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याची तयारी करत आहेत.
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
थलपती विजय आणि तृषा कृष्णन यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की, उमा कृष्णन यांनी आपली मुलगी, तृषा कृष्णनला पाठिंबा दर्शवण्यासाठीच कदाचित या व्हिडीओला 'लाईक' केलं असावं. दरम्यान, विजयच्या खाजगी आयुष्याबाबत सुरू असलेल्या अफवांमुळे समाजमाध्यमांवर बरीच चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या या कृतीचा अर्थ आपल्या मुलीला दिलेला पाठिंबा म्हणून लावला जात आहे.
ही चाहत्यांच्या मते हे 'लाईक' चुकूनही झालेलं असू शकतं. तरीही, सोशल मीडियावरील अनेक युजर्सचा असा दावा आहे की, उमा कृष्णन यांनी यापूर्वीही विजय आणि तृषा यांच्यातील संबंधांवर चर्चा करणाऱ्या अशा अनेक पोस्ट्स आणि 'रील्स'ना लाईक केलं आहे.
दरम्यान, विजय किंवा तृषा कृष्णन या दोघांपैकी कोणीही या अफवांबाबत अद्याप कोणतंही सार्वजनिक वक्तव्य केलेलं नाही. सध्या, विजय प्रामुख्यानं आपल्या राजकीय वाटचालीवर लक्ष केंद्रीत करत असून, आपल्या खाजगी आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी मौन बाळगलं आहे. विजय आणि तृषा यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं असून, पडद्यावरील त्यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
