Thalapathy Vijays Emotional Goodbye to Cinema: तामिळ सुपरस्टार विजय थलपतीचा चाहतावर्ग  प्रचंड मोठा आहे.  थलपतीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांचा जनसागर उसळतो. विजय थलपती फक्त सुपरस्टार नसून, त्याने राजकारण्याच्या मैदानातही शड्डू ठोकला आहे. त्याच्या पक्षाचे नाव 'तमिळगा  वेत्री कळघम' असे असून, ऑगस्ट  2024मध्ये त्यांनी पक्षाचा झेंडा आणि चिन्ह अधिकृतपणे लाँच केले आहे.  दरम्यान, विजय थलपती सिनेसृष्टीतून संन्यास घेणार आहे. ते पूर्णपणे राजकीय क्षेत्रात सक्रीय राहणार आहे. त्यांचा लवकरच शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.   'जन नायकन' असे चित्रपटाचे नाव असून,  या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ऑडिओ लाँच कार्यक्रम मलेशियात पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी सिनेसृष्टीला अलविदा करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.  

Continues below advertisement

'जन नायकन' या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता विजय थलपती दिसणार आहे. हा चित्रपट त्यांच्या सिने कारकिर्दीतील शेवटचा ठरणार आहे.  या  चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमासाठी थलपती मलेशियाला गेले होते. या कार्यक्रमात त्यांनी सिनेसृष्टी सोडून राजकीय क्षेत्रात उतरत असल्याचं जाहीर केलं.   अभिनेता म्हणाला, "जेव्हा मी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. तेव्हा मला वाटले की मी येथे लहान वाळूचा किल्ला बांधत आहे. पण तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासाठी राजवाडा बांधला.  चाहत्यांनी मला किल्ला बांधण्यास मदत केली. म्हणूनच मी त्यांच्यासाठी किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला आहे. चाहत्यांसाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी मी  सिनेमा  सोडत आहे", असं  विजय थलापती म्हणाले.

27 डिसेंबर  रोजी क्वालालंपुर येथील बुकिट जलील स्टेडियममध्ये 'जन नायकन' या चित्रपटाचा ऑडिओ लाँचिंग कार्यक्रम पार पडला.    या कार्यक्रमात जवळपास 100,000 चाहते आले होते. हा कार्यक्रम मलेशियात तुफान गाजला.   माहितीनुसार, श्रीलंकेनंतर मलेशियामध्ये जगातील सर्वात जास्त तामिळ लोकसंख्या असल्याची माहिती आहे.  यावेळी विजय थलपती यांनी चाहत्यांचे विशेष आभार मानले. 

Continues below advertisement

विजय थलपती यांनी मलेशियन चाहत्यांचे विशेष आभार मानले.  त्यांनी चाहत्यांचे आभार मानत म्हटलं की, "जर तुम्हाला  आयुष्यात यशस्वी  व्हायचे असेल तर, तुम्हाला मित्रांची गरज नसू शकते, पण  तुम्हाला एक मजबूत शत्रूची गरज असू शकते.  एका मजबूत शत्रूमुळे तुम्ही अधिक बलवान बनता.  2026मध्ये स्वत:ला ओळखा.   याचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा.  धन्यवाद मलेशिया..." असं विजय थलपती म्हणाले.  या कार्यक्रमात कडक सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांचा फौजफाटा होता.  'थलापथी थिरूविझा' नावाचा कार्यक्रम  उत्तमरित्या पार पडला. राजकीय सुरूवात करण्यापूर्वी त्यांनी या कार्यक्रमातून चित्रपट जगाला निरोप दिला.