Tuzech Mi Geet Gaat Aahe:  छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की स्वराज हा मल्हारनं त्याला दिलेला माउथ ऑर्गन वाजवत आहे. त्यानंतर मोनिका तिथे येते आणि स्वराजकडून त्याचा माउथ ऑर्गन काढून घेते. 


प्रोमोमध्ये दिसत आहे की, माउथ ऑर्गन वाजवत असताना स्वराजला मंजुळाची आठवण येत आहे. त्यावेळी मोनिका तिथे येते आणि स्वरादला म्हणते की, 'आता आवाज गेलाय तर माउथ ऑर्गननं त्रास देतोय पिहूला?'मोनिका स्वराजकडून माउथ ऑर्गन काढून घेते. 


पाहा प्रोमो






'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील स्वराजला बोलता येत नाहीये. त्यामुळे मल्हारला त्याच्याबद्दल चिंता वाटत आहे. 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या मागील एपिसोडमध्ये  मल्हार हा स्वरा उर्फ स्वराजला एक माउथ ऑर्गन देताना दिसत आहे. माउथ ऑर्गन देताना  मल्हार स्वराजला म्हणतो, ' स्वराज, हा माउथ ऑर्गन तुझा आवाज बनेल '  मल्हारनं स्वराजला  दिलेला हा माउथ ऑर्गन आता मोनिकानं घेतला आहे. त्यामुळे स्वराज हा दु:खी झाला आहे.






तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर  हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर ही साकारते. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 


उर्मिला कोठारेने तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. उर्मिलाने साकारलेली वैदेहीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता उर्मिला ही या मालिकेत मंजुळा ही भूमिका साकारत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मल्हार येतील का समोरासमोर? 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल