Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' (Tujhech Mi Geet Gaat Aahe) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांत मालिकेत येत असणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकतचं या मालिकेचं शूटिंग मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात पार पडलं आहे. 


'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेनं 'रंग माझा वेगळा' आणि 'आई कुठे काय करते' या मालिकांनादेखील मागे टाकलं आहे. या मालिकेत प्रेक्षकांना आता नवरात्री विशेष भाग पाहायला मिळणार आहे. या नवरात्री विशेष भागाचं शूटिंग नुकतचं मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरात पार पडलं आहे. 






नवरात्री विशेष भागात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार?


निरागस स्वराजची गाण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची धडपड आणि स्वराजला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकळतपणे मदत करणाला मल्हार कामत प्रेक्षकांना चांगलाच भावतो आहे. या मालिकेच्या नवरात्री विशेष भागात मल्हार आणि स्वराजमधला असाच एक भावनिक क्षण अनुभवायला मिळणार आहे. 


उर्मिला कोठारे पुन्हा मालिकेत दिसणार


'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या या विशेष भागातही स्वराज आणि मल्हार दिव्यांची आरास करण्याचा सीन शूट करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या भागात स्वराजची आई आणि मल्हारची पत्नी म्हणजेच अभिनेत्री उर्मिला कोठारेचेही खास सीन असणार आहेत. मल्हारच्या आठवणींमध्ये त्याची आई कायम असते. याच आठवणींच्या सीनमधून उर्मिला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


संबंधित बातम्या


Tujhech Mi Geet Gaat Aahe : ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत अभिनेत्री वनिता खरातची एण्ट्री, ‘रंजना’ बनून करणार स्वराची मदत!


Marathi Serial : 'तुझेच मी गीत गात आहे' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; 'रंग माझा वेगळा' पडली मागे