Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actor Dilip Joshi:  'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही टीव्ही मालिका जवळपास 16 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या शोमध्ये दिलीप जोशी (Dilip Joshi) 'जेठालाल'ची भूमिका साकारत आहेत. त्याचा अभिनय, संवाद बोलण्याची शैली  यामुळे प्रेक्षकांना ही व्यक्तीरेखा आवडली आहे.  या मालिकेने जितकी लोकप्रियता मिळवली तितकीच ती वादांच्या भोवऱ्यातही अडकली. विविध आरोप करत काही कलाकारांनी ही मालिका सोडली. कलाकारांना सेटवर वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलेला. काहींनी थेट शोषणाचेही आरोप केले. आता,  या मालिकेशी संबंधित राहिलेली, मिसेस रोशन सोढीची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने (Jennifer Mistry Bansiwal) मोठा गौप्यस्फोट केला आहे.  


अभिनेत्री जेनिफरने मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याशिवाय जेनिफरने गंभीर आरोप केल्यानंतर तिने असित कुमार मोदींविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला. जेनिफरने एका मुलाखतीत एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला. 'तारक मेहता...'च्या सेटवर मोठा राडा झाला. हा वाद इतका वाढला की जेठालालची भूमिका साकारणारे जेठालाल यांच्यावर खुर्ची फेकून मारण्यात आली. 






काय झाले होतं नेमकं?


जेनिफरने आपल्या मुलाखतीत सांगितले की, मालिकेच्या सेटवर कार्यक्रमाचा ऑपरेशनल हेड सोहिल रहमानी आणि अभिनेता दिलीप जोशी यांच्यात एका गोष्टीवरून वाद झाला. हा वाद खूपच वाढला. हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात सोहिलने दिलीप जोशींच्या दिशेने खुर्ची फेकून मारली. 


दिलीप जोशी यांनी दिली होती धमकी


जेनिफरने पुढे सांगितले की, या जोरदार भांडणानंतर दिलीप जोशी यांनी म्हटले की, जर सोहिल त्याच्यासोबत काम करत राहिला तर तो शो सोडेल. त्यामुळे पुढे आणखी वाद चिघळू नये म्हणून सोहिलला दिलीपपासून दूर राहण्याची सूचना देण्यात आली आणि दोन वर्षे हे असेच सुरू राहिले. सोहिलच्या गैरवर्तनामुळे इतर कलाकारांनीही त्याच्यावर बहिष्कार टाकला होता.


इतर महत्त्वाची बातमी: