Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाचा सीझन (Bigg Boss Marathi New Season) आता रंगू लागला आहे.  बिग बॉसच्या घरातील सहावा आठवडा सुरू झाला असून आठवड्यागणिक समीकरणे बदलताना दिसत आहेत. सुरुवातीला घरात काहीसा बुजरा असणारा गुलिगत सूरज चव्हाणही (Suraj Chavan) आता खुलू लागला असून घरातील इतर सदस्यांसोबत थट्टा-मस्करी करताना दिसत आहे. घरात पंढरीनाथ कांबळी अर्थात पॅडीदादासोबत बोलताना सूरजने "तुम्ही काहीही करा..मी भीत नाही'' असा इशारा दिला. 


काय झालं नेमकं?


'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. आज सूरज आणि पॅडी एकमेकांसोबत गुलिगत मस्ती करताना दिसणार आहेत. आज पॅडी दादा सूरजला म्हणत आहेत,"पुढच्यावेळी नॉमिनेशनमध्ये मी तुला नॉमिनेट करणार आहे". त्यावर पॅडी दादांना उत्तर देत सूरज म्हणतो,"तुम्ही काहीही करा..मी भीत नाही. मी घरातल्या कोणालाच भीत नाही". सूरज पुढे गंमतीत म्हणतो,"मी तुमच्या पोटाच्या चकल्या करेल. तोंडावर बोट ठेवा आणि शांत बसा. एकही शब्द बोलू नका". त्यावर पॅडी दादा सूरजला म्हणतात,"तू किंग आहेस काहीही करू शकतोस".






'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून सूरज प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आता सूरज आणि पॅडीची गुलिगत मस्ती प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणारी असणार आहे.  या आठवड्यात सूरज चव्हाण हा देखील इतर 6 सदस्यांसोबत नॉमिनेट झाला आहे. 


'हे' सदस्य झालेत नॉमिनेट


'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे 'बिग बॉस मराठी'च्या प्रेक्षकांच्या लक्ष लागले आहे. 


इतर संबंधित बातमी :