Sunetra Pawar on Suraj Chavan :  बारामीतच्या सूरजने (Suraj Chavan) बिग बॉसची (Bigg Boss Marathi New Season) ट्रॉफी जिंकल्यानंतर सध्या राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळतंय. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही प्रतिक्रिया देत सूरजचं कौतुक केलं होतं. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात बिग बॉस मराठी आणि त्याच्या विजेत्याची चर्चा सुरु असल्याचं चित्र आहे. त्यातच आता खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. 


बारामतीच्या लेकाचं सुनेत्रा पवारांनीही अगदी भरभरुन कौतुक केलंय. त्यामुळे सध्या सोशल मीडियासह सगळीकडे फक्त आणि फक्त सूरजचंच नाव दिसतंय. सूरज चव्हाणने बिग बॉसच्या 16 स्पर्धकांमधून बाजी मारत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय.                            


सुनेत्रा पवारांनी काय म्हटलं?


सुनेत्रा पवारांनी सूरजच्या विजयाचा फोटो शेअर करत म्हटलं की, बारामतीच्या सूरजने बिग बॉस जिंकले ..!आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या सुपुत्राने बिग बॉस शोचे विजेतेपद पटकावले. त्याचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतायत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला सूरज स्वत:च्या कलागुणांच्या बळावर आज जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथपर्यंत प्रसिद्धी पावला आहे. समस्त मराठी मनांचा लाडका झाला आहे.                       


पुढे त्यांनी म्हटलं की, सूरजने पहिल्या दिवसापासून बिग बॉस शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हाच खात्री पटली होती, की हे लेकरू बाजी मारणार. ती खात्री आज प्रत्यक्षात साकारली आहे.सूरजला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आवाहन केले होते त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही दिवसांपूर्वी त्याच्या मोढवे गावी जाऊन तो विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचे सार्थक झाले. या उत्तुंग यशाबद्दल सूरजचे खूप खूप अभिनंदन.






ही बातमी वाचा : 


Suraj Chavan : लक्ष्मी मिळाली, बक्षीसाच्या पैशातून घर बांधणार, घराला बिग बॉसचे नाव देणार, सूरज चव्हाणची कृतज्ञता