Shark Tank India Season 3 New Judges : 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) हा लोकप्रिय बिझनेस रिअॅलिटी शो आहे. या कार्यक्रमाचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता या बहुचर्चित कार्यक्रमाच्या तिसऱ्या कार्यक्रमाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 'शार्क टँक इंडिया 3' (Shark Tank India 3) संदर्भात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. लवकरच हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातील दोन परिक्षकांची नावे समोर आली होती. आता तिसऱ्या परिक्षकाचं नावंही समोर आलं आहे.


'शार्क टँक इंडिया'चे तिसरे परिक्षक कोण? (Shark Tank India Newest Judge)


'शार्क टँक इंडिया 3'मध्ये OYO Roomsचे संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) आणि झोमॅटोचे (Zomato) संस्थापक दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांची परिक्षक म्हणून निवड झाली होती. आता या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये नव्या परिक्षकाची एन्ट्री झाल्याचे दिसून येत आहे. इनशॉर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ अजहर इकबाल (Azhar Iqubal) यांची आता 'शार्क टँक इंडिया 3'मध्ये तिसरे परीक्षक म्हणून एन्ट्री झाली आहे. 






'शार्क टँक इंडिया 3'चा नवा प्रोमो चाहत्यांसह नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. प्रोमो आऊट झाल्याने प्रेक्षकांची कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. अजहर हा दिसायला खूपच हँडसम आहे. दिसण्यात अनेक बॉलिवूडकरांनाही तो मागे टाकेल. 


'शार्क टँक इंडिया 3'चं परिक्षण करणार दिग्गज 


'शार्क टँक इंडिया 3'चं परीक्षण अनेक दिग्गज मंडळी करणार आहेत. जुन्या परिक्षकांसह नवे परीक्षकही या कार्यक्रमाचं परिक्षण करणार आहेत. 'शार्क टँक इंडिया 3'चं एमक्योर फार्माचे दिग्दर्शक नमिता थापर, शुगर कॉस्मेटिकचे संस्थापक विनीता सिंह, शादी डॉट कॉमचे सीईओ अनुपम मित्तल, लेन्सकार्टचे सीईओ पीयूष गोयल, कार देखोचे सीईओ अमित जैन, ओयोचे सीईओ रितेश अग्रवाल आणि झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल, इनशॉर्ट्सचे सीईओ अजहर इकबाल हे दिग्गज मंडळी परिक्षण करणार आहेत. 


'शार्क टँक इंडिया 3' हा कार्यक्रम लवकरच सोनी लिव्ह (Sony LIV) अॅपवर सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनला आता सुरुवात झाली आहे. अद्याप या कार्यक्रमाची प्रीमियर डेट समोर आलेली नाही. 


संबंधित बातम्या


Shark Tank India 3: Oyo Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल यांची शार्क टँकमध्ये एन्ट्री; दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत