Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात यंदाच्या सीझनमधील पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. मिस्टर इंडिया राहिलेला संग्राम चौगुले (Sangram Chougule) आज बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. घरात प्रवेश करताच संग्रामने अरबाजला जोरदार ठस्सन दिली आहे. त्यामुळे आता संग्रामच्या एन्ट्रीने घरात काय होणार, कोणती नवीन समीकरणे जुळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
'बिग बॉस मराठी'चा या आठवड्याचा गणपती स्पेशल भाऊचा धक्का चांगलाच गाजला. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून 'छोटा पुढारी' घन:श्याम दरोडेने निरोप घेतला. अशातच याच आठवड्यात बिग बॉस मराठीमध्ये या सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्रीदेखील झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणार आज पहिला वाइल्ड कार्ड संग्राम चौगुले एन्ट्री घेणार आहे. संग्राम कसा खेळ खेळणार याकडे आता सर्वांचच लक्ष लागलं आहे.
अरबाजला फुल ऑन धमकी
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये संग्राम आपल्या नावाची पाटी घेत घरात एन्ट्री करताना दिसत आहे. ''छत्रपती शिवाजी महाराज की जय'' म्हणत संग्रामने घरात एन्ट्री घेतली आहे. घरात येताच संग्रामने अरबाजने फुल ऑन धमकी दिली आहे. ''आतापर्यंत तू जी पॉवर दाखवलीस ती वीक माणसाला दाखवली आहेस, तुला भेटेल फुल ऑन...'' असं घरात येताच संग्राम अरबाजला म्हणाला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये झाली सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच संग्राम चौगुले. आता नव्या सदस्याच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील ? नात्यांमध्ये काय बदल होतील ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल ? याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.
बिग बॉसच्या घरातील हा आठवडा खूप आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक असणार असल्याची अंदाज आहे.