Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) पाचव्या सिझनचा तिसरा आठवडा सूरजने गाजवून टाकला. कॅप्टन्सी टास्कमधला त्याचा खेळ प्रत्येकालाच आवडला. भाऊच्या धक्क्यावर रितेशेही (Ritiesh Deshmukh) त्याच्या खेळाचं भरभरुन कौतुक केलं. त्याचप्रमाणे त्याने असाच त्याचा गेम सुरु ठेवण्याचा कानमंत्रही त्याला दिला. पण असं असलं तरी त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळणाऱ्यांना रितेशने सक्त ताकीद देखील दिली आहे. 


कॅप्टन्सी टास्कमध्ये घरातल्यांनी सूरजच्या खेळाचं कौतुक केलंच पण तो रागवल्यानंतर त्याला शांत करण्याचाही प्रयत्न केला. त्याचप्रमाणे घरातले त्याला वारंवार खेळ समजावून देखील सांगत असतात. त्यामध्ये अनेकदा ते सूरजला कंट्रोल करत असल्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसतं. त्यावरुन रितेश देशमुखने घरातल्या इतरांची चांगलीच शाळा घेतली. 


रितेशनेही थोपटली सूरजची पाठ


रितेशने भाऊच्या धक्क्यावर सूरजचं कौतुक करत म्हटलं की, या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतलाय. ज्याने त्या संधीचं सोनं केलंय. त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. तुम्ही एकट्याने त्या सगळ्यांना टफ फाईट दिली आहे.झुंड में भेड़िये आते हैं, शेर अकेला आता है. 


अंकिता, पॅडी आणि धनंजयला दिली ताकीद


सूरजला त्याच्या खेळाविषयी बोलताना रितेशने म्हटलं की, सूरज आता तुम्हाला कळलं आहे, त्यामुळे बिनधास्त खेळा. पॅडीभाऊ, अभिजीत तुम्हाला नेहमी सांगतात की, घाबरायचं नाही, जसं बोलतायत तसं बोला, रोखठोक बोला. पण मला आता अंकिता धनंजय आणि पॅडी यांच्याशी देखील काहीतरी बोलायचं आहे. त्यांना रितेश म्हणतो की, तुम्ही त्यांना खेळ काय आहे ते समजवलं ना, मग आता त्याला खेळू द्या. त्याला मार्गदर्शन नक्की करा पण त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करु नका. महत्त्वाचं म्हणजे सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळू नका.  


एकदा सूरज अरबाजला नडला


कॅप्टन्सीच्या या टास्कवेळी गॅलरीत असलेल्या वैभवला सूरज म्हणतो की, मी त्याला मारलं नाही. त्यावर वैभव चव्हाण हा सूरजला तू असे हातपाय करू नकोस असे म्हणतो. वैभवच्या बोलण्यावर चिडलेला सूरज माझं मी बघेन असे सांगतो. तर, पुढे सूरज आणि अरबाजचा वाद होतो. त्यावेळी सूरज हा थेट अरबाजला भिडला. रजच्या या अँग्री अवताराने जान्हवी आणि निक्की देखील घाबरल्या. 






ही बातमी वाचा : 


Suraj Chavan : 'झुंड में भेड़िये आते हैं, शेर तो अकेला आता हैं'; सूरज चव्हाणच्या खेळावर रितेश भाऊही खूश, भरभरुन केलं कौतुक