Rinku Rajguru : 'बस बाई बस' (Bus Bai Bus) हा छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी सहभागी होत असतात. या कार्यक्रमाच्या आगामी भागात 'सैराट' (Sairat) फेम रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) सहभागी होणार आहे. रिंकू 'सैराट'च्या शूटिंग दरम्यानचे अनेक किस्से या कार्यक्रमात उलगडणार आहे.


'बस बाई बस' या कार्यक्रमात रिंकूचा दिलखुलास अंदाज पाहायला मिळणार आहे. विचारलेल्या प्रश्नांची ती मजेशीर उत्तरं देत आहे. 'सैराट 2' येणार की नाही यावर रिंकू स्पष्टच म्हणाली, 'सैराट 2' येणार की नाही याबद्दल मला माहीत नाही. शक्यतो नाहीच". पण पुढे ती म्हणाली,"सैराट' सिनेमाचा सिक्वेल येणार की नाही याबद्दल नागराज मंजुळे दादाच सांगू शकतील". 


'सैराट' सिनेमा येण्याआधी रिंकूला पोहायला येत होतं का? 


'बस बाई बस' या कार्यक्रमाचा नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये सुबोध रिंकूला मजेशीर प्रश्न विचारताना दिसत आहे. 'सैराट' सिनेमा येण्याआधी पोहायला येत होतं का? यावर उत्तर देत रिंकू म्हणाली,"नाही. सिनेमा येण्याआधीच मला पोहायला येत होतं. बाबांनी उन्हाळ्याच्या मला शिकवलं होतं. पण त्याचा उपयोग मला 'सैराट' सिनेमासाठी झाला. 






रिंकू पुढे म्हणाली," पोहायला येत असलं तरी उडी मी पहिल्यांदाच मारली आहे. शूटिंगदरम्यान मला खूप भीती वाटत होती. त्यामुळे मी उडी मारायला नकार देत होते. त्यावेळी सगळे मला म्हणाले की, उडी मारते की ढकलून देऊ. त्यावेळी मी म्हटलं," नको नको...मी मारते उडी". त्यानंतर विहिरीत उडी मारण्याचे दोन टेक झाले. पहिल्या टेकला चेहऱ्यावर भीती दिसली. पण नंतर ओके झालं". 


लग्न करायचं म्हणून तो रोज माझ्या घरी…”, रिंकूने शेअर केला किस्सा


रिंकू म्हणाली,"मी एका कार्यक्रमाला गेले असता एका चाहत्याला बघून सहज हात दाखवला. माझ्या लक्षातही नव्हतं तो कोण होता. एके दिवशी अचानक तो घरी आला आणि माझ्या आई-बाबांना म्हणाला मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तिने माझ्या डोळ्यात बघितलं आहे. ती रुक्मिणीचा अवतार आहे. मागच्या जन्मी मीही देव होतो. तर या जन्मी तुम्ही आमचं लग्न लावून द्या".


रिंकूने घातली अंगावर गाडी?


सैराटच्या आठवणींना उजाळा देत रिंकूने एक किस्सादेखील शेअर केला आहे. ती म्हणाली,"शूटिंगदरम्यानमध्ये थोडा वेळ मिळाला त्यावेळी मी गाडी चालवत होते. सेटवरचा प्रचंड उत्साही मेकिंग करणारा मुलगा अचानक मध्ये आला. दरम्यान त्याच्या पायावरून माझ्या गाडीचं चाक गेलं. आत्महत्या करताना माणसं चारवेळा समोरुन गाडी येत आहे की नाही बघतात. तर याने मेकिंग करताना पहायला हवं होतं".


संबंधित बातम्या


Kishori Pednekar On Amruta Fadnavis : 'अशी नशिबानं थट्टा मांडली...'; ठाकरेंना टोला लगावणाऱ्या अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांचं गाण्यातून प्रत्युत्तर


Sonalee Kulkarni : अमृता खानविलकर आणि माझ्यात कोणतंही वैर नाही; सोनाली कुलकर्णीचा व्हिडीओ व्हायरल