Raj Thackeray In Khupte Tithe Gupte : 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte)  या कार्यक्रमाचा राज ठाकरे विशेष भाग अर्थात अनकट महाएपिसोडचं आज प्रसारण होणार आहे. लोकाग्रहास्तव हा विशेष भाग दाखवण्यात येणार  आहे. या विशेष भागाची राज ठाकरेंचे चाहते प्रतीक्षा करत आहेत. 


सिनेमांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले,"मी सिनेमावेडा आहे. जगभरातील सिनेमे मी पाहत असतो. मला असं वाटतं की बायोपिक करायला खूप कमी व्यक्तिमत्त्व आहेत. बायोपिकसाठीची व्यक्ती अशी असायला हवी की त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. मला वाटतं भारतातील इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक यायला हवेत". 






'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातील राज ठाकरेंचे अनेक प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये राज ठाकरे त्यांच्या लेकाबद्दल म्हणजेच अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याबद्दल भाष्य करताना दिसत आहेत. 


राज ठाकरे म्हणत आहेत,"अमितला सिनेमात काम करायची इच्छा होती. त्याला अनेक चांगल्या सिनेमांसाठी विचारणादेखील होत होती. महेश मांजरेकरांनीदेखील त्याला विचारलं होतं. पण सिनेमाचं नाव कळताच मी त्याला काम न करण्यास सांगितलं. त्या सिनेमाचं नाव होतं 'एफयू'. मी महेशला म्हणालो,"बाकिच्यांना एफयू म्हणतोय ते पुरेसं नाही का? अमितला यात नको घेऊ".  


'खुप्ते तिथे गुप्ते'चा विशेष भाग कधी पाहायला मिळणार? 


'खुप्ते तिथे गुप्ते'चा राज ठाकरेंचा अनकट दोन तासांचा विशेष भाग प्रेक्षकांना आज (11 जून) दुपारी 12 वाजता पाहायला मिळणार आहे. या भागात ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक खुलासे करताना दिसतील. तर आज रात्री 9 वाजता श्रेयस तळपदेसोबत खुमासदार गप्पा रंगणार आहेत. 'खुप्ते तिथे गुप्ते'च्या पहिल्याच भागात राज ठाकरेंनी हजेरी लावली होती. हा भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे आता लोकाग्रहास्तव विशेष भागाचं आयोजन करण्यात आलं आहे.  


'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात  राज ठाकरे विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तर देताना दिसले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध, बारसू रिफायनरी, मनसे पक्षाची वाटचाल, त्यांच्यावर होणारी टीका यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. 


संबंधित बातम्या


Khupte Tithe Gupte : राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना करणार फोन ; ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल