Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता रजंक वळण येणार आहे. बाळाच्या बारशाला इंद्राच्या विनंतीवरून कार्तिक हजेरी लावणार आहे. त्याला पाहून सागर संतापतो. कार्तिक फक्त हजेरी लावत नाही तर बाळाचे नामकरण करायला घरातले सदस्य म्हणून सावनीलाच बोलावतो. आता बारशाच्या वेळी घरात काही नाट्य घडणार का, आदित्यनेच माधवीचा अपघात केलाय हे समोर येणार का, बारशाच्या दिवशी आणखी काही घडणार का हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


कोळी कुटुंबाच्या घरात स्वातीच्या मुलीच्या बारशाची तयारी सुरू असते. मुक्ता आवडीने शिरा तयार करते आणि स्वातीला चव पाहण्यासाठी देते. शिरा गोड झाला असला तरी माझे तोंड कडू झाले आहे आणि त्यासाठी तूच जबाबदार असल्याचे स्वाती मनातल्या मनात बोलते.


कार्तिकला पाहून सागरचा संताप


बारशासाठी कार्तिक घरी येतो. त्याला पाहून सागरचा संतापतो. कार्तिकला मी बोलावले असल्याचे इंद्रा सागरला सांगते. हे बाळ स्वाती-कार्तिकचे आहे, पूजा कार्तिक स्वातीच करणार असल्याचे इंद्रा सांगते. घरातील पाहुण्यांसमोर उगाच घरातले वाद दिसू नये, सईदेखील पाहत आहे. म्हणून वाद आणखी वाढू नये मुक्ता सागरला सांगते. मुक्ताच्या सांगण्यावरून सागरही काही बोलत नाही. 


सावनीला पाहून घरातल्यांना बसला धक्का


बाळाचे नाव ठेवण्यासाठी कार्तिक आपले नातेवाईक आले असल्याचे सांगतो. माझ्या घरचे कोणीही नसले तरीही माझ्या पडत्या काळात ज्यांनी मला साथ दिली अशी एक व्यक्ती आज इथे येणार आहे. तीच माझी फॅमिली आहे आणि तीच माझ्या बाळाचं नावही ठेवेल. त्याच वेळी सावनी आदित्यसह येते. माझ्या बाळाचे नाव सावनीच ठेवतील असे कार्तिक सांगतो. सावनीला पाहून घरातील लोकांना धक्काच बसतो. इंद्रालाही संतात येतो. सावनी आल्याचे पाहून बापूदेखील इंद्राला झालं का तुमचं समाधान असे विचारतात. 


सई करणार बाळाचे नामकरण


बाळाच्या अंगावर सावनीच्या अंगावर उलटी करते. सावनी साडी स्वच्छ करण्यासाठी बाथरुममध्ये जाते. मुहूर्त टळत असल्याचे पाहून गुरुजी बाळाचे नाव ठेवण्यासाठी घाई करतात. त्यावर कार्तिक गुरुजींवर संतापतो.त्यावर इंद्रा  माझ्या नातीने बाळाचे नाव ठेवले तर चालेल का, गुरुजीदेखील त्याला होकार देतात. सई बाळाचे नाव जुई असे ठेवते.  सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवत असतात तितक्या तिथे सावनी येते. बाळाचे नामकरण ती करणार असते. पण आपल्याशिवाय हे नामकरण झाल्याने सावनी चिडते. मुक्ताने बाळाचे नामकरण केले असावे असे तिला वाटते. पण सईने नामकरण केला असल्याचे समजल्यानंतर ती शांत होते. 


सावनीवर सागर संतापणार 


आदित्यलाा घेऊन सावनी घरी आल्याने सागर तिच्यावर संतापतो. बाळाचे नामकरण झाल्यानंतर सागर सावनीला दुसऱ्या रुममध्ये घेऊन जातो आणि तिच्यावर राग व्यक्त करतो.तू आदित्यला इथे का आणलास जर त्याने मुक्ताच्या आईला पाहिलं तर तो घाबरेल असे सागर सावनीला सांगतो. पण, आदित्य हा सावनीच्या आमंत्रणावरून आला असल्याचे सांगते. पण, त्यावर सागर तिला तुला थोडी पण अक्कल नाही का? असे विचारतो. गाडी आदित्य ड्राईव्ह करत होता हे मी लपवतोय आणि तूच त्याला समोर घेऊन येतेस असे सागर सावनीला बोलत असतो. सागरचे हे बोलणं सुरू असताना मुक्ता तिथे येते.