Nyrraa Banerji  Injured KKK 13 Shooting : 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13)  हा रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) साहसी खेळ असणारा कार्यक्रम आहे. 'खतरों के खिलाडी 13'चं सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. दरम्यान या शूटिंगदरम्यान स्पर्धकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता शूटिंगदरम्यान नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. 


'खतरों के खिलाडी 13' हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. दरम्यान या कार्यक्रमातील रोहित रॉय, अरिजित तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा हे स्पर्धक स्टंट करताना झालेल्या दुखापतीमुळे चर्चेत आहेत. आता अभिनेत्री नायरा बॅनर्जीलाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. 


'खतरों के खिलाडी 13'च्या सेटवर नायरा बॅनर्जीला दुखापत


पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, नायरा बॅनर्जीला पाण्याशीसंबंधित स्टंट करताना दुखापत झाली आहे. नायरा बोटीवर असताना स्टंट पूर्ण करण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी तिने पायात लांब मोजे न घातल्याने तिला दुखापत झाली. पण तरीही तिने स्टंट मात्र पूर्ण केला. तिच्या या कृतीचे इतर स्पर्धकांनी कौतुक केले.  


ऐश्वर्या शर्मा आणि अरिजित तनेजालाही दुखापत


'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतील अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झालेली दिसून आली.दरम्यान अरिजित तनेजाला काही दिवसांपूर्वी किरकोळ दुखापत झाली होती. त्याने त्याच्या हातावरचे ओरखडे दर्शविणारा फोटो शेअर केला होता. 'दाग अच्छे हैं..' असं म्हणत त्याने हा फोटो शेअर केला होता.






'खतरों के खिलाडी 13'मध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग


'खतरों के खिलाडी 13'मध्ये डेजी शाह, अर्जित तनेजा, शीझान खान, रुही चतुर्वेदी, रोहित बोस रॉय, रश्मीत कौर, अंजुम फकीह, अंजली आनंद आणि शिव ठाकरे हे स्पर्धक सहभागी होणार आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात 'खतरों के खिलाडी 13'चं प्रसारण होणार आहे. 'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकची जोडी दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.


संबंधित बातम्या


Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'नंतर शिव ठाकरे गाजवणार Rodies! सेटवरील फोटो समोर