Nikki Tamboli Evicted From Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमध्ये सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेल्या आणि पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवलेल्या निक्की तांबोळीला अखेर घरातून बाहेर जावं लागलं आहे. निक्कीच्या बाहेर जाण्यामुळे मात्र सोशल मीडियावर चांगल्याच प्रतिक्रिया येत आहेत. निक्कीच्या कर्मामुळेत ती बाहेर पडली, आता तुला समजेल महाराष्ट्र तुझा किती मनापासून द्वेष करत होता, निक्की बाहेर पडल्यामुळे आता बिग बॉस रडणार अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.  


निक्की बाहेर पडल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?


या जगात तुम्ही क्वीन नाही आहात हे समजून घ्या. आजपर्यंत लोकांचं खच्चीकरण करून, त्यांना खाली ओढून तुमची ताई इथपर्यंत आली. पण इतकी जवळ येऊनही, अखेर कर्मामुळे ती पडलीच. आज बाहेर आल्यानंतर तुम्हाला कळेल की महाराष्ट्र तुमच्यावर किती मनापासून द्वेष करत होता. फक्त TRP मुळे तुम्हाला एवढं लांब आणलं, पण शेवटी पडलं. एक गोष्ट मात्र नक्की, बिग बॉस आज खूप रडतील, कारण त्यांची लाडाची निक्की आता घरात दिसणार नाही.


पहिल्या आठवड्यापासून वाट पाहतोय याची. 


कॉन्ट्रॅक्ट संपलं असं कोणाला कोणाला वाटतं.


अख्खा महाराष्ट्र ह्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता.


बाईईईईईई खूप छान झाला हा प्रकार


आता जरा गार गार वाटतंय, बरं वाटल मनाला. 


निक्की तांबोळी कोण? 


बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतल्यापासून निक्की तांबोळी हे नाव चर्चेत होतं. निक्कीने याआधी बिग बॉस हिंदीमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे निक्कीने आतापर्यंत तीन दाक्षिणात्य आणि दोन हिंदी सिनेमे केले आहेत. निक्कीने 'कंचना 3', 'चिकती गदिलो चित्रकोट्टु' आणि 'थिप्पारा मीसम' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निक्की एका अभिनेत्रीसह मॉडेल देखील आहे. निक्कीने  तमिळ, तेलगू चित्रपटांत निक्कीने भूमिका साकारलेल्या आहेत.


बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला 28 जुलैपासून सुरुवात झाली होती. एकूण 16 स्पर्धकांनी प्रवेश केला होता. पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोव्हा, घन:श्याम दरवडे, वैभव चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, आर्या जाधव या स्पर्धकांनी 28 जुलै रोजी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. त्यानंतर संग्रामने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. पण यातील एक एक करुन 10 स्पर्धक एलिमिनेट होत गेले. 


बिग बॉसचा खेळ 70 दिवसांतच संपला 


बिग बॉस हा खेळ 100 दिवसांचा असतो. याआधीही बिग बॉस मराठीचे जे चार सीझन झाले, तेही 100 दिवसांचेच होते. पण यंदा हा खेळ फक्त 70 दिवसच ठेवण्यात आला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनला सुरुवात होत आहे. त्याचमुळे मराठीच्या सीझनने लवकर निरोप घेतला असल्याचं म्हटलं जातंय.