Nikhi Chavan and Shivani Baokar : झी मराठी वाहिनीवर काही वर्षांपूर्वी आलेल्या 'लागिरं झालं जी' (Lagir Zala Ji) या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. साताऱ्यातील फौजीची ही प्रेमकथा आणि देशसेवेची कथा ही प्रेक्षकांना फारच भावली. या मालिकेतून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले. या मालिकेत अभिनेत्री शिवानी बावंकर (Shivani Baokar) ही मुख्य भूमिकेत होती. याच मालिकेमुळे शिवानी घरांघरांत पोहचली. याच मालिकेत तिच्यासोबत अभिनेता निखिल चव्हाण (Nikhil Chavan) देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. आता पुन्हा एकदा हे दोन्ही कलाकार चर्चेत आले असल्याचं पाहायला मिळतंय.
शिवानी आणि निखिल सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेले आहेत. निखिलने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याच्यासोबत शिवानी देखील दिसत आहे. दरम्यान शिवानी आणि निखिल यांनी या फोटोवर दिलेल्या कॅप्शनने आता वेगळ्याच चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. दरम्यान त्यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.
निखिलची पोस्ट नेमकी काय?
दरम्यान निखिलने त्याच्या सोशल मीडियावर शिवानीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यावर त्याने म्हटलं की, आम्ही डिसेंबरकडे पाहताना... त्यामुळे शिवानी आणि निखिल हे दोघेही डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडणार का? अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे त्यांनी अनेकांना संभ्रमात टाकल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे डिसेंबर महिन्यात नक्की काय होणार याची उत्सुकता आता त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
फोटोवर कमेंट्सचा पाऊस
दरम्यान या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स पाऊस पाडला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, नक्की म्हणायचं काय आहे तुम्हाला? दरम्यान अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचाही वर्षाव केला असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शिवानी आणि निखिलमध्ये नक्की काय सुरु आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
अभिनेत्री शिवानी बावंकर ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचप्रमाणे निखिल चव्हाण हा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे आता हे दोघेही एकत्र काम करणार की एकत्र आयुष्याची सुरुवात करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीये.