Marathi Serial Updates : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत (Saara Kahi Tichyasathi) सध्या दादा खोतांची लेक निशी आणि नीरजच्या लग्न सोहळ्याची लगबग सूर आहे. आपलं प्रेम ज्याच्यावर जडलं त्या नीरजसोबत आता लग्नगाठ बांधली जात असल्याने निशी प्रचंड आनंदात आहे. तर, दुसरीकडे आता श्रीनिवास अर्थात श्रीनूचे बारा वाजणार आहे. मालिकेतील कथानकात आता नवे ट्वीस्ट येणार आहेत.
निशी आणि नीरजचे लग्न होत असून त्यांचे प्रेम यशस्वी होत असल्याचे दिसतंय. तर, दुसरीकडे श्रीनू-ओवीच्या प्रेमातील अडथळे संपत नसून आता वाढू लागले आहेत. घरात आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे श्रीनूच्या चेहऱ्यावर बारा वाजले आहेत.
श्रीनूच्या लग्नाचा विचार खोत कुटुंब करत आहे आणि श्रीनुची वधू म्हणून ते चारूचा विचार करत आहे. पण, श्रीनुच्या हृदयात ओवी आहे ह्याची कल्पना खोत कुटुंबाला नाही. पण चारूच्या मनात श्रीनू भरलाय आहे. बालपणीची मैत्रीतल्या प्रेमाला श्रीनू साद देईल अशी आशा चारूला आहे. चारू ही आत्या मंजूशी बोलताना सतत श्रीनूचा उल्लेख करतेय. तर, चारूनेच श्रीनू सोबत लग्न करावे असा मंजूलादेखील वाटतेय.
दादा खोत सुद्धा चारूसाठी स्थळं बघत आहेत. सुरुवातीला चारूच्या वागण्याकडे फारसं लक्ष न देणारा श्रीनू आता सावध राहत आहे. तर, लाली देखील चारुला सून करण्यासाठी आणि श्रीनूच्या मनात तिला भरण्यासाठी
मुद्दाम काही गोष्टी घडवून आणण्यासाठी धडपडते आहे.
ओवीचा वाढदिवस श्रीनू साजरा करणार?
मालिकेतील कथानकात आता ओवीचा वाढदिवसही येणार आहे. चारुला ओवी आणि श्रीनूमध्ये सुरू असलेल्या प्रेमाची कुणकुण लागली आहे. त्यामुळे ओवीचा वाढदिवस श्रीनूला साजरा करता येणार नाही यासाठी चारू सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
तर, हे सर्व सुरू असताना दुसरीकडे निशी आणि नीराजच्या लग्न विधी सुरु आहेत. खूप काळानंतर घरात एक मंगलकार्य पार पडत आहे म्हणून सगळे आनंदात आहेत. ह्या सगळ्या गोंधळात श्रीनु ओवीचा वाढदिवस साजरा करणार का, ओवी-श्रीनुच्या प्रेमात चारू खलनायिका होणार का, हे लवकरच प्रेक्षकांना समजेल.