एक्स्प्लोर

'आई कुठे काय करते'नं निरोप घेतल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला नवी कोरी मालिका, 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत'

New Serial Aai Aani Baba Retire Hot Aahet: 'आई कुठे काय करते'नं निरोप घेतल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला नवी कोरी मालिका, 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' येत आहे.

Upcoming Serial Aai Aani Baba Retire Hot Aahet: नुकत्याच स्टार प्रवाहावरची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'नं (Ai Kuthe Kay Karte) प्रेक्षकांचा निरोप घेतला. आवडत्या मालिकेचा शेवटचा भाग पाहून अनेक प्रेक्षक भावूक झाले. तसेच, मालिकेतील कलाकारही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता स्टार प्रवाहवर (Star Pravah) एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' (Aai Aani Baba Retire Hot Aahet), असं प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या नव्या मालिकेचं नाव आहे. मालिकेचं शीर्षक ऐकताक्षणीच आपल्या डोळ्यासमोर रिटायर्ड झालेले आपले आई-बाबा येतात आणि आपोआप डोळे पाणावतात. 

प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं. आयुष्यभर खस्ता खाऊन आईवडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. त्यांना नाऊ-माखू घालण्यापासून शिकून सवरुन स्वतःच्या पायावर उभं करण्यापर्यंत सगळं अगदी काटोकोरपणे या दोन व्यक्ती करतात. पण, मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी राहिली की, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. आई आणि बाबा रिटायर होत आहेत, ही मालिका देखील अशाच एका जोडप्याभोवती फिरते, ज्यांना खरंतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे, मात्र न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ते अडकले जातात. दिग्गज कलावंत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या नव्या मालिकेतून भेटीला येणार आहेत.

या मालिकेतल्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना निवेदिता सराफ म्हणाल्या, आमच्या वयाच्या नटांची नेहमी एक खंत असते की, आता आपल्यापाशी अनुभवाची शिदोरी आहे. मात्र तरीही आई-वडिलांच्या भूमिकांमध्ये न अडकता आपल्यासाठीही मध्यवर्ती भूमिका लिहिली जावी. टीव्ही माध्यमाची मी आभारी आहे की, आम्हाला मध्यवर्ती घेऊन भूमिका लिहिल्या जात आहेत. या मालिकेतलं सुधा हे पात्र मला खूपच भावलं. 'माझ्यासोबत आता तू देखील  संसारातून रिटायर हो' हे नवऱ्याचं म्हणणं तिला पटतं, मात्र तिचं मन मात्र हे मानायला तयार नसतं. घर-संसारात तिचा जीव अडकला आहे. प्रत्येक गृहिणीला आपलसं वाटेल असं हे पात्र आहे."

अभिनेते मंगेश कदम नव्या मालिकेतील आपल्या भूमिकेबाबत सांगताना म्हणाले की, "मालिकेचा विषय आपल्या खूप जवळचा आहे. रिटायरमेंट नंतर काय करायचं हे प्रत्येकानं ठरवलेलं असतं. यशवंतचं देखील असंच एक स्वप्न आहे. कोकणातल्या घरी आपल्या पत्नीसोबत निवांत आयुष्य जगायचं, असं त्यानं मनाशी ठरवलेलं आहे. यशवंतप्रमाणे जवळपास प्रत्येकाचंच हे स्वप्न असतं. मात्र आई-बाबा आपल्या जबाबदारीमधून कधीही रिटायर होत नाहीत. नात्यांची उत्तम गुंफण असणारी हृदयस्पर्शी कथा घेऊन येतोय याचा खूप आनंद आहे."

स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, "आई आणि वडील हे आपले दैवत असतात आणि ही मालिका त्यांना आणि त्यांच्या निःस्वार्थपणाला अर्पण आहे. जे बोट धरून आपण चालतो, जी पावलं आपल्याला बळ देतात ती सुद्धा कधीतरी थकतील, त्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदारीतून कधी तरी मुक्तता मिळायला हवी. त्यांना सुद्धा जाणीव करून देणं फार महत्वाचं असतं की आता आराम करा. मुलं, सुना, जावई, नातवंडं अशी अनेक नाती उलगडत जाणारी गोष्ट आणि आई-वडील त्यांची भूमिका कशी शेवटपर्यंत ठामपणे आणि प्रामाणिकपणे बजावतात हे अधोरेखित करणारी ही मालिका आहे. ही मालिका सर्वांच्या घरात आणि मनात स्थान मिळवेल यात शंका नाही. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत 2 डिसेंबरपासून दुपारी 2.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मुंबई पुणे मुंबई 4 कधी येणार? मुक्ता बर्वेला टॅग करत खुद्द स्वप्नील जोशीनं दिलं उत्तर, म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Vidarbha vs Kerala Final 2025 : रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Pope Francis Health Update : कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक
कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक
Embed widget